Join us

Padmaavat Movie :  'पद्मावत' सिनेमासंदर्भातील या 10 गोष्टी तुम्हाला विचार करण्यास पाडतील भाग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 12:46 PM

संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित व बहुप्रतीक्षित 'पद्मावत' सिनेमाचे वाद संपता संपत नाहीयत. 

मुंबई - संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित व बहुप्रतीक्षित 'पद्मावत' सिनेमाचे वाद संपता संपत नाहीयत.  सिनेमाचं प्रदर्शन एका दिवसावर आलेले असतानाही सिनेमाविरोधात जोरदार निदर्शनं सुरूच आहेत. मात्र 'पद्मावत'मध्येही भन्साळींच्या दिग्दर्शनाची छाप नक्कीच पडली आहे, एवढं मात्र निश्चित. सिनेमागृहातून बाहेर पडल्यानंतरही 'पद्मावत' हृदयात, मनात आणि डोक्यात राहतोच, अशीच सिनेमाची भन्नाट मांडणी आणि कहाणी आहे. 

पद्मावतच्या 10 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला विचार करायला भाग पाडतात -  

1. रिलीजपूर्वीच वादग्रस्त ठरलेला संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावत' सिनेमासंदर्भातील 10 अशा गोष्टी आहेत की ज्यांच्या प्रश्नांचा भडीमार सिनेमागृहाबाहेर आल्यानंतरही तुमच्या डोक्यात सतत सुरूच राहिल. राजपूतांबाबत कोणतीही आक्षेपार्ह बाब नसताना या सिनेमावरुन एवढा वाद कशाकरता निर्माण करण्यात आला?  हा प्रश्न सर्वात आधी तुमच्या डोक्यात उपस्थित होऊ शकतो.

2.  शाहिद कपूरनं महाराजा रावल रतन सिंह यांच्या भूमिकेला न्याय दिला आहे. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत शाहिद एका सभ्य व सालस राजाच्या भूमिकेत दिसला आहे. मात्र अलाउद्दीन खिलजीची भूमिका साकारणा-या रणवीर सिंहनं संपूर्ण सिनेमात भाव खाल्ला आहे.  या सिनेमातही रणवीर सिंहची तुफान एनर्जीमध्ये पाहायला मिळत आहे. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत एक सनकी, व्यभिचारी आणि खुंटलेल्या मानसिकतेतल्या खिलजीची जिवंत भूमिका त्यानं साकारली आहे. 

3. 'पद्मावत' सिनेमामध्ये इतिहासासोबत छेडछाड करण्यात आल्याचा आरोप राजपूत संघटनांनी केला होता. मात्र खरंतर असे एकही दृश्य या सिनेमामध्ये पाहायला मिळालेलं नाही.  मलिक मोहम्मद जायसी यांच्या 1540 मध्ये लिहिण्यात आलेल्या 'पद्मावत' कथेवर हा सिनेमा साकारण्यात आला आहे.  यामध्ये राजपूत महाराणी पद्मावती यांची शौर्य गाथा मांडण्यात आली आहे. 

4. सिनेमाच्या शेवटी महाराज रावल रतन सिंह आणि अलाउद्दीन खिलजी यांच्यातील तलवारबाजीच्या दृश्यादरम्यान रतन सिंह आपली तत्त्व, आदर्श आणि युद्धांच्या नियमांचे पालन करत खिलजीचा पराभव करतात. मात्र राणी पद्मावतीला मिळवण्याच्या हव्यासानं पेटलेला खिलजी रतन सिंह यांचा कपटानं घात करत त्यांची हत्या करतो.  

5. मात्र राजपूतांची शान वाचवण्यासाठी राणी पद्मावती जौहरसाठी जाते आणि खिलजीची तिला पाहण्याची इच्छा पूर्ण होऊ देत नाही, हीच सिनेमाची कहाणी आहे.

Padmaavat Movie Review: 'पद्मावत' पाहणार नसाल तर नक्कीच होईल पश्चाताप 

6. सिनेमाच्या प्रत्येक दृश्यात डोक्यापासून ते पायापर्यंत दीपिका पादुकोण पूर्णतः झाकलेली दिसत आहेत. आपल्या चेह-यावरील आणि विशेषतः डोळ्यांच्या हावभावावरुन दीपिका संपूर्ण सिनेमामध्ये अप्रतिम दिसली आहे. दीपिका पद्मावतमध्ये अतिशय आकर्षक, मनमोहक दिसली आहे.  

7. प्रेम व्यक्त करणे असो किंवा कोणत्याही प्रकारच्या भावना असोत दीपिकानं अतिशय आकर्षक पद्धतीनं आपल्या दमदार अभिनयातून मांडले आहे. विशेषतः यात तिचे डोळे कमालीचे मनमोहक वाटत आहेत. 30-30 किलोचे सुंदर लेहंगे, वजनदार दागिने आणि विशिष्ट पद्धतीची नथ या वेशाष दीपिका खूपच सुंदर दिसली आहे.  

8. या सिनेमामध्ये खिलजी आणि राणी पद्मावतीमध्ये कोणतेही दृश्य चित्रित करण्यात आलेले नाही. 

9. घुमर डान्समध्ये सुरुवातीला दाखवण्यात आलेली दीपिका कंबर अत्याधुनिक तंत्रांचा वापर करुन झाकण्यात आली आहे.  

10. ज्या पद्धतीनं पद्मावत सिनेमामध्ये राजपूत समुदायाची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. तसे कोणतीही दृश्य सिनेमामध्ये चित्रित करण्यात आलेले नाही. याउलट शानदार पद्धतीनंच राजपूतानेशाही मोठ्या पडद्यावर संजय लीला भन्साळी यांनी साकारली आहे. 

टॅग्स :पद्मावतपद्मावतीबॉलिवूडदीपिका पादुकोणशाहिद कपूररणवीर सिंग