तरुण आरोपीला उच्च न्यायालयाने दिली सुधारण्याची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:06 AM2020-12-26T04:06:08+5:302020-12-26T04:06:08+5:30
दोन गुन्ह्यांमध्ये आरोपी असतानाही अंतरिम जामीन मंजूर तरुण आरोपीला उच्च न्यायालयाने दिली सुधारण्याची संधी दोन गुन्ह्यांमध्ये आरोपी : अंतरिम ...
दोन गुन्ह्यांमध्ये आरोपी असतानाही अंतरिम जामीन मंजूर
तरुण आरोपीला उच्च न्यायालयाने दिली सुधारण्याची संधी
दोन गुन्ह्यांमध्ये आरोपी : अंतरिम जामीन केला मंजूर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अर्जदार २० वर्षीय असून त्याला सुधारण्याची संधी दिली पाहिजे. ‘सुधारण्यासाठी प्रयोग’ असे म्हणत उच्च न्यायालयाने पुण्याच्या तरुणाविरोधात दोन गुन्हे नोंदविलेले असतानाही त्याची अंतरिम जामिनावर सुटका केली.
अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली हा आरोपी येरवडा कारागृहात आहे. महिलेचा विनयभंग केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे, असे म्हणत न्यायालयाने त्याच्यावर ससून रुग्णालयातील क्लिनिकल सायकॉलॉजिस्टकडून समुपदेशन सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. सध्या आरोपीचे समुपदेशन सुरू आहे. त्यामुळे मदतच होणार आहे. कारण आरोपीला त्याच्या कृत्याचा पश्चात्ताप होत आहे की हेच प्रकार त्याला सुरू ठेवायचे आहे, हे समजेल, असे न्या. भारती डांगरे यांच्या एकसदस्यीय खंडपीठाने सांगितले.
आराेपीला सुधारण्याची संधी मिळावी, अशी विनंती आरोपीच्या वकिलांनी न्यायालयाला केली. १० फेब्रुवारीपासून आरोपी येरवडा कारागृहात आहे. त्याचे वय पाहता त्याला बराच काळ कारागृहात ठेवले तर तो अट्टल गुन्हेगार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे म्हणत न्यायालयाने २२ डिसेंबर रोजी आरोपीचा अंतरिम जामीन अर्ज मंजूर केला.
...................................