लहान मुलं, गर्भवती महिला, वृद्धांनी श्रमिक ट्रेनमधून प्रवास करू नये; रेल्वे मंत्रालयाची महत्त्वाची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 06:35 PM2020-05-29T18:35:08+5:302020-05-29T18:43:30+5:30

श्रमिक विशेष ट्रेनमधून १० वर्षाखालील लहान मुले, गर्भवती महिला, ६५ वर्षावरील वृद्धांनी प्रवास करु नये...

Young children, pregnant women, the elderly should not travel by train | लहान मुलं, गर्भवती महिला, वृद्धांनी श्रमिक ट्रेनमधून प्रवास करू नये; रेल्वे मंत्रालयाची महत्त्वाची सूचना

लहान मुलं, गर्भवती महिला, वृद्धांनी श्रमिक ट्रेनमधून प्रवास करू नये; रेल्वे मंत्रालयाची महत्त्वाची सूचना

Next

मुंबई : श्रमिक विशेष ट्रेनमधून १० वर्षाखालील लहान मुले, गर्भवती महिला, ६५ वर्षावरील वृद्धांनी प्रवास करु नये, असे आवाहन रेल्वे मंत्रालयाने केली आहे. यासह उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, हृदरोगाचा त्रास असलेल्या प्रवाशांनी रेल्वे प्रवास टाळावा, असे आवाहन रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आले आहे.

लॉकडाऊनमुळे ठिकठिकाणी अडकलेल्या श्रमिकांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्यासाठी रेल्वेने श्रमिक विशेष गाड्या सुरु केल्या आहे. मात्र या ट्रेनला इच्छितस्थळी पोहचण्यासाठी खूप विलंब होत आहे. अनेक रेल्वे गाड्या आपल्या मार्गावरुन भरकटल्या, तर प्रवास लांबल्यामुळे या श्रमिकांच्या जेवणाची, पाण्याची आबाळ झाल्याच्या घटना समोर आल्या. परिणामी,  ट्रेनमध्ये काही श्रमिकांचा मृत्यु झाला. या पार्श्ववभूमीवर १० वर्षाखालील लहान मुले, गर्भवती महिला, ६५ वर्षावरील वृद्धांनी प्रवास करू नये, आजारी प्रवाशांनी प्रवास करू नये, असे आवाहन रेल्वे मंत्रालयाने केले आहे. 

--------------------

 ज्या मजुरांच्या कुटुंबात १० वर्षाखालील लहान मुले, गर्भवती महिला, ६५ वर्षावरील वृद्ध माणसे आहेत, त्यांनी प्रवास कसा करायचा. या व्यक्तींना एकटे सोडून घर गाठायचे कसे, असा प्रश्न या श्रमिकांना पडला आहे.    

-----------------------

देशभरात अडकलेल्या प्रवाशांना इच्छितस्थळी पोहचविण्यासाठी १ जूनपासून २०० विशेष ट्रेन धावणार आहेत. मात्र आजरी रुग्ण, जेष्ठ नागरिक  यांना कोरोनाची लागण होण्याची भीती सर्वाधिक आहे. त्यामुळे २०० विशेष ट्रेनमध्ये १० वर्षाखालील लहान मुले, गर्भवती महिला, ६५ वर्षावरील वृद्धांनी प्रवास करु नये, असे आवाहन लागू होऊ शकते. दरम्यान, रेल्वे मंत्रालयाकडून या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.
------------------

Web Title: Young children, pregnant women, the elderly should not travel by train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.