तरुण पत्रकारांनी क्रांती घडवली पाहिजे

By admin | Published: June 23, 2014 01:58 AM2014-06-23T01:58:44+5:302014-06-23T01:58:44+5:30

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे. त्या वेळी झालेल्या आणीबाणीच्या काळात लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून समजल्या जाणाऱ्या पत्रकारितेला अनेकांनी वेळोवेळी विरोध केला,

Young journalists have to create a revolution | तरुण पत्रकारांनी क्रांती घडवली पाहिजे

तरुण पत्रकारांनी क्रांती घडवली पाहिजे

Next

मुंबई : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे. त्या वेळी झालेल्या आणीबाणीच्या काळात लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून समजल्या जाणाऱ्या पत्रकारितेला अनेकांनी वेळोवेळी विरोध केला, गळचेपीही केली. तरीही बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक यांनी अन्याय सहन करून तुरुंगवास भोगून पत्रकारितेला स्वातंत्र्य मिळवून दिले. म्हणून आता राष्ट्रीय एकात्मतेसाठी तरुण पत्रकारांनी क्रांती घडवली पाहिजे, असे उद्गार केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काढले.
महर्षी नारद जयंतीनिमित्त विश्व संवाद केंद्राचा यंदाचा ‘महर्षी नारद पत्रकार पुरस्कार’ लोकमतच्या मुख्य उपसंपादिका मेघना ढोके आणि टाइम्स आॅफ इंडियाचे अंबरिश मिश्रा यांना देण्यात आला. स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. इंडियन मर्चंट्स चेंबरमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रकाश जावडेकर उपस्थित होते; याप्रसंगी ते बोलत होते.
प्रकाश जावडेकर म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक हुतात्म्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे, शिवाय प्रसंगी बलिदान दिले आहे. स्वातंत्र्य मिळवण्याच्या काळातच पत्रकारितेलाही स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळेच त्यांनी मिळवून दिलेल्या स्वातंत्र्याचा पुरेपूर वापर करा. त्याचबरोबरीने हिताच्या तसेच त्यांना न्याय देण्यासंदर्भातल्या बातम्या द्या. टीआरपी मिळवण्यासाठी ज्या खळबळजनक बातम्या दिल्या जातात; त्या पत्रकारितेला अशोभनीय आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Young journalists have to create a revolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.