Join us

ऑफरच्या साड्यांसाठी तरुणीला गमवावे लागले ३३ हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ऑफरमधील साड्यांसोबत लॅपटॉप फ्रीच्या आमिषाला बळी पडल्याने तरुणीला ३३ हजार रुपयांचा फटका बसला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ऑफरमधील साड्यांसोबत लॅपटॉप फ्रीच्या आमिषाला बळी पडल्याने तरुणीला ३३ हजार रुपयांचा फटका बसला आहे. याप्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार या फणसवाडी परिसरात राहण्यास आहेत. दि. २९ डिसेंबरला तिला एका महिलेचा कॉल आला. तिने मिशो अँपच्या दिल्ली येथील शाखेमधून पूजा बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर तिने या ॲपवरून ७१० रुपये किमतीची साडी विकत घेतली असता ऑफरमध्ये तीन साड्या मिळणार असल्याची बतावणी केली.

तरुणीने तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ३ हजार ३६४ रुपयांना तीन साड्या विकत घेतल्या.

सावज जाळ्यात अडकल्याचे समजताच, तरुणीला

या साड्यांवर ४६ हजार ९९० रुपये किमतीचा लॅपटॉप मिळाल्याचे सांगितले. त्यासाठी ८ हजार ४५८ रुपये जीएसटी भरावा लागेल, असे सांगितले.

तरुणीने हिने ही रक्कम भरताच ७१० रुपये किमतीची साडी तिच्या घरी पोच झाली. त्यामुळे आणखी विश्वास बसला. त्यानंतर पूजाने लॅपटॉपचा तीन वर्षांचा विमा म्हणून ५ हजार ६३८ रुपये, लॅपटॉपचा लिंकअप चार्ज म्हणून ४ हजार ९३२ रुपये, लॅपटॉप डिलिव्हरी चार्ज म्हणून ४ हजार ४७० रुपये असे एकूण ३२ हजार ९९४ रुपये उकळले.

पैसे भरूनही लॅपटॉप न मिळाल्याने यात, आपली फसवणूक झाल्याची खात्री पटताच तरुणीने बहिणीसह पोलिसांत धाव घेतली. यात, लोकमान्य टिळक मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.

.......................