Join us

मित्राला बोनेटवर बसवून अल्पवीयन मुलाने चालवली कार; माजी सरकारी अधिकाऱ्याच्या मुलाचा प्रताप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 4:32 PM

Viral Video : पुण्यातले अपघाताचे प्रकरण ताजे असताना कल्याणमध्येही अल्पवयीन मुलाने कार चालवत स्टंट केल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

Kalyan BMC Viral Video : पुण्यात अल्पवयीन मुलाने दारुच्या नशेत भरधाव वेगात कार चालवून दोघांची हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच कल्याणमध्येही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याणमध्ये १७ वर्षाच्या मुलाने वडिलांची बीएमडब्ल्यू कार चालवल्याचे समोर आलं आहे. अल्पवयीन मुलाने एवढ्यावरच न थांबता त्याच्या मित्राला गाडीच्या बोनेटवर बसवलं होतं. त्यानंतर त्याला घेऊन तो रस्त्यात फिरत होता. हा सगळा प्रकार तिथल्या काही लोकांनी मोबाईलमध्ये कैद केला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी बोनेटवर बसलेल्या तरुणाला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे भरदिवसा वर्दळ असणाऱ्या रस्त्यावर हा सगळा प्रकार सुरु होता. तसेच पुण्यातील घटना ताजी असतानाच अल्पवयीन मुलाला गाडी चालवण्यास कशी दिली हा देखील सवाल उपस्थित केला जात आहे.

पुणे पोर्श कारचा अपघाताी सध्या देशभरात चर्चा सुरु आहे. अशातच आता कल्याणमधून एका अल्पवयीन मुलाचा कारसोबत स्टंट केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये अल्पवयीन बीएमडब्ल्यू कार चालवत आहे आणि त्या कारच्या बोनेटवर त्याचा मित्र झोपलेला दिसत आहे. कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौक परिसरात अल्पवयीन मुलाने हा स्टंट केल्याचे समोर आलं आहे. महत्त्वाचे म्हणजे हा परिसर वर्दळीचा होता. असे असूनही अल्पवयीन मुलाने त्याच्या मित्रासोबत हा स्टंट केला.

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, व्हायरल व्हिडिओमध्ये एक अल्पवयीन मुलगा भर गर्दीत पांढऱ्या रंगाची बीएमडब्ल्यू कार चालवत आहे. या कारच्या बोनेटवर त्याचा २१ वर्षीय मित्र निवांत झोपल होता. बोनेटवर झोपलेल्या तरुणाला पाहून तेथून जाणाऱ्या लोकांनाही आश्चर्य व्यक्त केले. कारच्या बोनेटवर झोपलेल्या तरुणाचे नाव शुभम मितालिया असल्याचे समोर आलं. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याला तत्काळ अटक करण्यात आली. तर अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडील सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्याचे पुढे आलं आहे. व्हिडीओ काढणाऱ्या लोकांना शुभम मितालिया आपला व्हिडीओ काढून घ्या असे बिंधास्तपणे सांगताना दिसत आहे.

दरम्यान, याप्रकरणी अल्पवयीन मुलाला वैध चालक परवान्याशिवाय गाडी चालवण्याची परवानगी दिल्याबद्दल माजी अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :कल्याणसोशल व्हायरलपोलिसगुन्हेगारी