तरुणाने बलात्काराचा व्हिडिओ बनवला; महिलेच्या नवऱ्यानेच तो व्हायरल केला, मुंबईतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 02:10 PM2021-09-09T14:10:20+5:302021-09-09T14:10:54+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, ब्लॅकमेलरने आधी महिलेवर बलात्कार केला आणि या घटनेचा व्हिडीओ शूट केला.

The young man made a video of the rape; It was the woman's husband who made it viral, the incident in Mumbai | तरुणाने बलात्काराचा व्हिडिओ बनवला; महिलेच्या नवऱ्यानेच तो व्हायरल केला, मुंबईतील घटना

तरुणाने बलात्काराचा व्हिडिओ बनवला; महिलेच्या नवऱ्यानेच तो व्हायरल केला, मुंबईतील घटना

googlenewsNext

मुंबई: मुंबईतील देवनार परिसरात एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. विवाहितेवर बलात्काराचा व्हिडीओ शूट करुन तिला ब्लॅकमेल करणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. तसेच पीडित महिलेच्या पतीलाही अटक करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, ब्लॅकमेलरने आधी महिलेवर बलात्कार केला आणि या घटनेचा व्हिडीओ शूट केला. त्यानंतर तिला धमकी दिली, की जर त्याला ५.२० लाख रुपये दिले गेले नाहीत, तर तो हे बलात्काराचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेल. त्यानंतर महिलेने आरोपी ब्लॅकमेलरला पैसे दिले नाहीत, त्यामुळे त्या व्यक्तीने ते व्हिडीओ तिच्या पतीला पाठवले. आपल्या पत्नीला आधार देण्याऐवजी पतीनेही तिलाच ब्लॅकमेल करुन घटस्फोट मागण्यास सुरुवात केली. इतकंच नाही, तर पतीने पत्नीचे व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.

आरोपी पती मुंबईहून उत्तर प्रदेशातील श्रावस्ती येथील त्याच्या घरी पळून गेला होता. पोलिसांनी त्याला तिथून पकडले. त्यानंतर त्या महिलेवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीलाही पकडण्यात आले. पोलिसांनी दोन्ही आरोपींवर बलात्कार, खंडणीसह इतर कलमांखाली गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली आहे.

Web Title: The young man made a video of the rape; It was the woman's husband who made it viral, the incident in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.