मुसळधार पावसात पोयसर नदीच्या पूरात तरुण वाहून गेला
By मनोहर कुंभेजकर | Published: July 19, 2023 08:48 PM2023-07-19T20:48:50+5:302023-07-19T20:49:12+5:30
तरुणाला शोधून काढावे, अशी मागणी आमदार सुनील प्रभू यांनी केली.
मुंबई-आज झालेल्या मुसळधार पावसात पश्चिम उपनगरातील नद्यांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली.यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून वाहणाऱ्या पोयसर नदीला पूर आल्याने यात क्रांतीनगर येथील २५-२७ वर्षाचा तरुण वाहून गेला.त्यामुळे महापालिका व राज्य शासनाने शोध मोहीम हाती घेवून या तरुणाला शोधून काढावे अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधी मंडळ मुख्य प्रतोद,आमदार सुनील प्रभू यांनी केली.
आपत्कालीन परिस्थिती का निर्माण झाली याचा शोध घेवून आपण सरकारवर टिका करू.मात्र सध्या नागरिकांना सर्वांनी मिळून मदत केली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.
तसेच मुसळधार पाऊस पडत असेल तर गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे.तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी स्वतःची, कुटुंबाची काळजी घ्यावी. आणि महापालिका,आपत्कालीन यंत्रणा आणि फायरब्रिगेडने जागरूक राहणे गरजेचे आहे असे आमदार प्रभू म्हणाले.