तरुणांच्या पार्टीचा वेग बेतला वृद्धेच्या जिवावर

By admin | Published: March 14, 2017 07:37 AM2017-03-14T07:37:58+5:302017-03-14T07:37:58+5:30

होळीनिमित्त खंडाळ्याला पार्टीसाठी निघालेल्या तरुणांच्या भरधाव कारच्या धडकेत एका वृद्धेसह दोघांना जीव गमवावा लागल्याची घटना विक्रोळीत घडली

The young party's speed over the death of an old boy | तरुणांच्या पार्टीचा वेग बेतला वृद्धेच्या जिवावर

तरुणांच्या पार्टीचा वेग बेतला वृद्धेच्या जिवावर

Next

मुंबई : होळीनिमित्त खंडाळ्याला पार्टीसाठी निघालेल्या तरुणांच्या भरधाव कारच्या धडकेत एका वृद्धेसह दोघांना जीव गमवावा लागल्याची घटना विक्रोळीत घडली. या प्रकरणी कारचालक भावीन रमेश खारवा (२२) याला मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
लुसी इगलेसी डिसुजा (६८), पुरुषोत्तम प्रभाकर प्रभू (४६) अशी मृतांची नावे आहेत. विक्रोळी पूर्वेकडील स्टेशन रोड परिसरात डिसुजा या कुटुंबीयांसोबत राहतात. रविवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास डिसुजा या मुलगा जॉन गेरीसोबत चर्चमध्ये प्रार्थना करून रिक्षाने घरी निघाल्या. त्याच दरम्यान विक्रोळी पूर्वेकडील बिंदू माधव ठाकरे चौकावरील सिग्नलवर त्यांची रिक्षा थांबली. त्याच दरम्यान भरधाव वेगाने आलेल्या मारुती रिट्झ कारने रिक्षाला मागून धडक दिली. डिसुजा यांचे डोके रिक्षाच्या मीटरला जोरात आदळले, तर रिक्षाचालक प्रभू हे पुढची काच फुटून रिक्षा आणि टेम्पोच्या मध्ये चिरडले गेले. हा अपघात एवढा भीषण होता की, टेम्पोचालक मोहम्मद माहेरम सुरई (४३) हेसुद्धा गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच विक्रोळी पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी तिघांनाही बाहेर काढले. उपचारांसाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी डिसुजा आणि प्रभूला मृत घोषित केले.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या मृत्यूस जबाबदार ठरले म्हणून खारवाला अटक केली. खारवा हा गोरेगाव येथील रहिवासी आहे. त्याचा व्यवसाय आहे. होळीनिमित्त खंडाळ्याला पार्टी करण्यासाठी तो त्याच्या चार मित्रांसोबत भरधाव वेगाने निघाला होता. त्याच दरम्यान हा अपघात घडला. मात्र खारवा याने रिक्षाचालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे अपघात झाल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The young party's speed over the death of an old boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.