मद्यपी वाहनचालकांमध्ये तरुणांचा भरणा

By admin | Published: January 6, 2016 01:19 AM2016-01-06T01:19:37+5:302016-01-06T01:19:37+5:30

दारू पिऊन वाहन चालवणे हा गुन्हा आहे, याची माहिती असूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या तरुणांची संख्या लक्षणीय आहे. मागील वर्षभरात दारू पिऊन वाहन

Young people in alcoholic driving | मद्यपी वाहनचालकांमध्ये तरुणांचा भरणा

मद्यपी वाहनचालकांमध्ये तरुणांचा भरणा

Next

मुंबई : दारू पिऊन वाहन चालवणे हा गुन्हा आहे, याची माहिती असूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या तरुणांची संख्या लक्षणीय आहे. मागील वर्षभरात दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरोधात मुंबई वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत २१ ते ३0 वयोगटातील सर्वाधिक तरुण आढळले आहेत. यात जवळपास ९ हजार ५२१ जणांवर कारवाई केल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.
दारू पिऊन वाहन चालवणे हा गुन्हा असून त्याविरोधात वाहतूक पोलीस नेहमीच कठोर कारवाई करतात. तळीराम चालक आढळल्यास वाहतूक पोलिसांकडून दोन हजार रुपये डिपॉझिट घेतले जाते. तसेच याबाबत न्यायालयातही केस चालवून दंड आकारणी, लायसन्स जप्ती किंवा शिक्षा याबाबतीतही निर्णय घेतला जातो. शिक्षेची एवढी तरतूद असतानाही त्याकडे तळीराम चालक दुर्लक्षच करतात. यात तर खासकरून तरुणांना कायद्याचा धाकच राहिला नसल्याचे दिसते. मागील वर्षभरात दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरोधात केलेल्या कारवाईत तब्बल १८ हजार ३५ जण जाळ्यात अडकले आहेत. यात २१ ते २५ वयोगटातील ४ हजार ५१७ तर २६ ते ३0 वयोगटातील ५ हजार ४ तरुणांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे १८ ते २0 वयोगटातीलही ४८६ जणांना पकडण्यात आल्याची माहिती देण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे करण्यात आलेल्या कारवाईमध्ये दुचाकीस्वारांचा सर्वात जास्त समावेश आहे. ११ हजार १७७ दुचाकीस्वार जाळ्यात अडकले असून ५ हजार ९६९ चार चाकी चालकांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Young people in alcoholic driving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.