क्रांतिसिंहांच्या कार्याचा वसा तरुणांनी घ्यावा - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 02:30 AM2017-08-04T02:30:09+5:302017-08-04T02:30:11+5:30

सर्वांसाठी समता, न्याय प्रस्थापित करणे, तसेच संपूर्ण समाजाचे उत्थान होण्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केलेले कार्य थोर आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचा वसा तरुणांनी घ्यावा,

 Young people should take the fat of Krantisinh work - Chief Minister | क्रांतिसिंहांच्या कार्याचा वसा तरुणांनी घ्यावा - मुख्यमंत्री

क्रांतिसिंहांच्या कार्याचा वसा तरुणांनी घ्यावा - मुख्यमंत्री

Next

मुंबई : सर्वांसाठी समता, न्याय प्रस्थापित करणे, तसेच संपूर्ण समाजाचे उत्थान होण्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केलेले कार्य थोर आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचा वसा तरुणांनी घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दादरच्या क्रांतिसिंह नाना पाटील मंडई तरुण उत्कर्ष भाजीपाला व्यापारी मंडळातर्फे आयोजित ११७व्या जयंती सोहळ््यात ते बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी समाजासह देशाची स्थिती आणि इंग्रजांचा जुलूम पाहिल्यावर देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्मी त्यांच्यात जागृत झाली. स्वत:कडील पैसा समाजासाठी कसा उपयोगी पडेल, याकडे त्यांचा कल होता. त्यांच्या समाजकार्याचा वसा तरुणपिढीने घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. दादरच्या मंडई संदर्भात अध्यक्षांनी काही प्रश्न मांडले होते. त्यातील काही प्रश्न मार्गी लागले असून, पुढील प्रश्नांवरही लवकरच चर्चा केली जाईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात दिले.
या कार्यक्रमात सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, माजी राज्यमंत्री, आमदार शिवाजीराव नाईक, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. आशिष शेलार, आमदार अनिल बाबर, आमदार विलासराव जगताप यांचीही उपस्थिती होती.
या वेळी क्रांतिसिंह नाना पाटील मंडई तरुण उत्कर्ष भाजीपाला व्यापारी मंडळाचे अध्यक्ष शंकर पाटील म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून नाना पाटील यांची जयंती साजरी केली जात आहे. नाना पाटलांची आठवण अशीच जनतेने ठेवावी. पंधराशे गावांचा शेतसारा जमवून ते लोकांना वाटप करण्याचे काम त्या वेळी क्रांतिसिंहांनी केले. येथील व्यापाºयांच्या काही समस्या आहेत. त्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावल्या जाव्यात. मात्र, समस्यांसाठी आंदोलन करणारी आम्ही माणसे नाहीत, असेही त्यांनी नमूद केले.

Web Title:  Young people should take the fat of Krantisinh work - Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.