दुर्मीळ आजाराशी संघर्ष करणाऱ्या तरुणाला हवी वैद्यकीय मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:09 AM2021-09-16T04:09:58+5:302021-09-16T04:09:58+5:30
या आजारावर वैद्यकीय उपचार करण्यासाठी अनेक सरकारी योजना आणि संस्थांकडे त्या अवस्थेमध्येही पायपीट केली. मात्र, हा आजार सरकारी ...
या आजारावर वैद्यकीय उपचार करण्यासाठी अनेक सरकारी योजना आणि संस्थांकडे त्या अवस्थेमध्येही पायपीट केली. मात्र, हा आजार सरकारी योजनांमध्ये न बसणारा असल्यामुळे अनेक संस्था, न्यास, ट्रस्ट, मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष यांच्याकडून निधी उपलब्ध होऊ शकला नाही. हा आजार त्या कक्षेमध्ये येत नाही, असे कारण देण्यात आल्याचे स्वप्निल मालाडकर यांनी सांगितले.
आत्तापर्यंत मित्रपरिवारांनी, गाववाल्यांनी, माझ्या कॉलेज ने आर्थिक स्वरूपात वेळोवेळी मदत केली आहे. त्यामुळे या दुर्मीळ आजाराशी यशस्वीपणे लढा दिला आहे. पण सध्याच्या परिस्थितीत मला माझ्या ट्रीटमेंटसाठी आर्थिक मदत मिळत नाही आहे. तरी इच्छुकांनी आर्थिक मदत करावी, अशी विनंती या तरुणाने केली आहे. अधिक माहितीसाठी 9969077089 या मोबाईल वर फोन करावा.
----;-----------------------------------------------