माजी विद्यार्थ्यांकडून तरुणांना स्टार्टअपची संधी
By admin | Published: March 22, 2017 01:45 AM2017-03-22T01:45:29+5:302017-03-22T01:45:29+5:30
आयआयटीमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांचा अनुभव शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडावा.
मुंबई : आयआयटीमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांचा अनुभव शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडावा. त्यांच्यात संवाद साधला जाऊन नवनवीन संकल्पनांचा जन्म व्हावा. माजी विद्यार्थ्यांमुळे आत्ताच्या विद्यार्थ्यांना स्टार्टअपसाठी साहाय्य मिळावे यासाठी आयआयटी कॅम्पसमध्ये माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
दोन दिवसीय संमेलनात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विविध प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात संशोधक, शास्त्रज्ञ, व्यावसायिक हे उपस्थित होते. आत्ताच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला, नवीन संकल्पना सत्यात कशा उतरवता येतील याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या संमलेनामुळे संशोधक एकाच छताखाली आल्याने त्याचा अधिक फायदा विद्यार्थ्यांना झाला.
माजी विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांनी मिळून स्टार्ट्अपसाठी आर्थिक साहाय्य देण्यात येणार असल्याचे सांगितले. १० लाख रुपयांपर्यंत नवीन स्टार्टअपसाठी आर्थिक साहाय्य मिळवण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. (प्रतिनिधी)