धावत्या लोकलमध्ये तरुणीवर अत्याचार; आरोपीच्या चार तासांत मुसक्या आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2023 06:10 AM2023-06-16T06:10:29+5:302023-06-16T06:11:04+5:30

CSMT ते मशीद बंदर स्थानकांदरम्यान मुंबई-पनवेल लोकलमध्ये बुधवारी सकाळी घडली होती घटना

Young woman assaulted in Mumbai CSMT Panvel local the accused arrested Within four hours | धावत्या लोकलमध्ये तरुणीवर अत्याचार; आरोपीच्या चार तासांत मुसक्या आवळल्या

धावत्या लोकलमध्ये तरुणीवर अत्याचार; आरोपीच्या चार तासांत मुसक्या आवळल्या

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सीएसएमटी ते मशीद बंदर स्थानकांदरम्यान मुंबई-पनवेल लोकलमध्ये बुधवारी सकाळी एका तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला चार तासात अटक झाली आहे. नवाजू करीम शेख (४०) असे या आरोपीचे नाव आहे. मात्र, या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीने नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथे कॉलेजला जाण्यासाठी सीएसएमटीवरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून सकाळी ०७.२६ वाजेची पनवेल लोकल पकडली. सदर मुलगी महिलांसाठीच्या जनरल डब्यातून प्रवास करत होती. सकाळची वेळ असल्यामुळे महिला डब्यामध्ये विशेष प्रवासी नव्हते. याचाच गैरफायदा घेत आरोपीने सीएसएमटी स्थानकात गाडीने वेग घेतल्यानंतर महिला डब्यात प्रवेश केला.

दारूच्या नशेतील तरुणाने तिच्याशी शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न केला. पीडित तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर आरोपी मशीद बंदर स्थानकावर लोकलमधून उतरला आणि बाहेर पळून गेला. पीडित तरुणीदेखील मशीद बंदर स्टेशनवर उतरली आणि तिने रेल्वे पोलिसांना माहिती दिली. सीएसएमटी लोहमार्ग पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध बलात्काराच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीला अवघ्या चार तासात मशीद बंदर रेल्वे स्थानकाच्या परिसरातून अटक केली.

Web Title: Young woman assaulted in Mumbai CSMT Panvel local the accused arrested Within four hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.