Join us

आई रागावते म्हणून तरुणीने मृत्यूला कवटाळले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 4:05 AM

मालवणी आत्महत्या प्रकरण; चाैकशीतील प्राथमिक अंदाज, पाेलीस तपास सुरूलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मालाडच्या मालवणी परिसरात गुरुवारी प्रीती ...

मालवणी आत्महत्या प्रकरण; चाैकशीतील प्राथमिक अंदाज, पाेलीस तपास सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मालाडच्या मालवणी परिसरात गुरुवारी प्रीती रामबाबू साहनी (२०) या तरुणीने आत्महत्या केली. यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी आई रागावत सतत बडबड करते म्हणून तिने मृत्यूला कवटाळल्याचे तिच्या मित्रमंडळींनी पोलिसांना सांगितले. त्यानुसार पाेलीस अधिक तपास करत आहेत.

मालवणीच्या आझमीनगर परिसरात राहणाऱ्या प्रीतीच्या (२०) आत्महत्येप्रकरणी तिच्या मित्र-मैत्रिणींकडे पोलिसांनी केलेल्या चौकशीत तिचे तिच्या आईसोबत पटत नसल्याचे समाेर आले. लहान-मोठ्या कारणांनी आई तिला सतत बडबडत असल्याने तिच्या मनात त्याबाबत राग होता. याच कारणास्तव तिने हे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र, अजूनही तिचे नातेवाईक तसेच अन्य कुटुंंबीयांची चौकशी सुरू असून, या आत्महत्येमागील कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

अब्बासिया कंपाऊंड, राठोडी येथे गुरुवारी सकाळी प्रीती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. याबाबत स्थानिकांनी मालवणी पोलिसांना कळवताच त्यांनी घटनास्थळी येत तिचा मृतदेह ताब्यात घेत विच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालयात पाठवला. अद्याप याप्रकरणी सुसाईड नोट सापडलेली नाही.

.............................................