उघड्या केबल डक्टमध्ये तरुणी पडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:07 IST2021-07-17T04:07:13+5:302021-07-17T04:07:13+5:30
मुंबई : अंधेरी पश्चिम येथील डी.एन. नगर स्थानकाजवळील उघड्या केबल डक्टमध्ये एक तरुणी शुक्रवारी सकाळी पडली. या घटनेचा व्हिडीओ ...

उघड्या केबल डक्टमध्ये तरुणी पडली
मुंबई : अंधेरी पश्चिम येथील डी.एन. नगर स्थानकाजवळील उघड्या केबल डक्टमध्ये एक तरुणी शुक्रवारी सकाळी पडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावरून शुक्रवारी दिवसभर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. या भागात मेट्रो रेल्वेचे काम सुरू असून तो एमएमआरडीएच्या अखत्यारीत आहे. या डक्टवरील झाकण समाजकंटकांनी काढले होते. मात्र हे झाकण पुन्हा बसविण्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली.
२०१७ मध्ये मुसळधार पावसात उघड्या मॅनहोलमध्ये पडून पोटविकारतज्ज्ञ दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मुंबईतील उघड्या मॅनहोलचा प्रश्न ऐरणीवर आला. शुक्रवारी सकाळी अंधेरी पश्चिम येथील उघड्या केबलचा अंदाज न आल्याने तरुणी त्यात पडली. या ठिकाणी ‘मेट्रो २ ए’ प्रकल्पाची कामे सुरू आहेत. पालिकेने याबाबत माहिती घेतल्यानंतर ‘मेट्रो २ ए’ प्रकल्पाच्या परिरक्षणाखालील जागेत असणाऱ्या उपयोगितांचे झाकण हे काही असामाजिक तत्त्वांद्वारे हटविण्यात आल्याचे समोर आले. या घटनेनंतर महापालिकेने तत्काळ त्या ठिकाणी झाकण बसविल्याचे के पश्चिम विभागाचे साहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी सांगितले.