मोजावे लागले ५० हजार
सहलीसाठी इंस्टाग्रामवरून बंगला बुक करणाऱ्या तरुणीची फसवणूक
५० हजारांना गंडा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लोणावळ्यात सहलीसाठी इंस्टाग्रामवरून बंगला बुक करणे मलबार हिल येथील ग्राफिक डिझायनर तरुणीला महागात पडले आहे. अस्तित्वात नसलेल्या बंगल्यासाठी तिला ५० हजार मोजावे लागले आहेत. याप्रकरणी मलबार हिल पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.
मलबार हिल परिसरात २८ वर्षीय तक्रारदार तरुणी राहते. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, २४ जून ते २७ जूनदरम्यान लोणावळा भागात सहलीला जाण्यासाठी ती बंगल्याच्या शाेधात हाेती. दरम्यान, तिने इंस्टाग्रामवर बंगल्याची जाहिरात पाहिली. संबंधित कॉलधारकाने बंगल्याचे फोटो पाठविले. ३ दिवसांसाठी ७२ हजार रुपयांमध्ये व्यवहार ठरला.
ठरल्याप्रमाणे आगाऊ रक्कम म्हणून तिने ५० हजार रुपये पाठवले. पुढे पैसे भरूनही बंगल्याबाबत काहीही माहिती मिळत नसल्यामुळे तिला संशय आला. तिने लोणावळ्यातील नातेवाइकाला संबंधित ठिकाणी जाऊन बंगल्याची पाहणी करण्यास सांगताच, तेथे बंगला नसल्याचे तिला समजले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.
.............................