प्रेमप्रकरणातून तरुणाची आत्महत्या
By Admin | Published: February 14, 2016 02:55 AM2016-02-14T02:55:20+5:302016-02-14T02:55:20+5:30
प्रेमप्रकरणातून २२वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी चेंबूरमध्ये घडली. विकी चोपडा (२२) असे या तरुणाचे नाव असून, या प्रकरणी आरसीएफ पोलीस
मुंबई : प्रेमप्रकरणातून २२वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी चेंबूरमध्ये घडली. विकी चोपडा (२२) असे या तरुणाचे नाव असून, या प्रकरणी आरसीएफ पोलीस अधिक तपास करीत आहेत.
चेंबूर येथील कामावाडी परिसरात विकी कुटुंबीयांसोबत राहत होता. कॉल सेंटरमध्ये काम करत असलेल्या विकीचे त्याच परिसरातील तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्याने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. दुपारी घरी परतलेल्या आईने बराच वेळ दरवाजा ठोठावला. मात्र आतून काहीच प्रतिसाद येत नसल्याने शेजारच्यांच्या मदतीने दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता, विकी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
आरसीएफ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकीच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये त्याने प्रेयसीचा उल्लेख केलेला आहे. माझे एका तरुणीवर प्रेम आहे. सध्या मी समाधानी नसून माझ्या जगण्यात अर्थ नाही. तू माझ्या कुटुंबीयांची काळजी घे’ अशा प्रकारचा मजकूर लिहिण्यात आला आहे. त्यामुळे प्राथमिक तपासात प्रेमप्रकरणातून हे पाऊल उचलल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती आरसीएफ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप राऊत यांनी दिली. (प्रतिनिधी)