Join us

तुमची नवरी पळून जाणार आहे! ‘त्या’ मेसेजमुळे नवरदेव टेन्शनमध्ये, नेमकं काय घडलं पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 12:40 PM

‘तुमची नवरी पळून जाणार आहे, ती माझ्या सोबत बोलते. आम्ही एकमेकांना ओळखतो,’ अशा आशयाचे मेसेजेस २३ वर्षीय तरुणीच्या होणाऱ्या पतीला पाठविण्यात आले.

मुंबई :‘तुमची नवरी पळून जाणार आहे, ती माझ्या सोबत बोलते. आम्ही एकमेकांना ओळखतो,’ अशा आशयाचे मेसेजेस २३ वर्षीय तरुणीच्या होणाऱ्या पतीला पाठविण्यात आले. हे मेसेज मोबाइलवर येऊन धडकताच नवरदेव प्रचंड टेन्शनमध्ये आला. होणाऱ्या बायकोला याप्रकरणी सांगितल्यानंतर आणि हे सर्व बदनामीचे प्रकरण असल्याचे कळल्यानंतर त्याचा जीव भांड्यात पडला. अशा प्रकारच्या बदनामीसाठी इन्स्टाग्राम स्टोऱ्यांचाही वापर होत होता.  यासाठी इन्स्टाग्रामवर तिचे बनावट खाते तयार करण्यात आले. याविरोधात तिने वनराई पोलिसांत धाव घेतल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध सुरू आहे.पीडित तरुणी ही गोरेगाव पूर्वच्या एसआरपीएफ कॅम्प परिसरात कुटुंबासोबत राहते. ती वाणिज्य शाखेच्या शेवटच्या वर्षात शिकत असून, १७ मे रोजी तिचे लग्न ठरले आहे. मात्र, २५ मेपासून तिचाच फोटो आणि लग्नपत्रिका अनोळखी व्यक्ती इन्स्टाग्राम स्टोरी म्हणून ठेवू लागला. तसेच तिच्या होणाऱ्या पतीला त्याची होणारी पत्नी म्हणजे पीडित तरुणी ही पळून जाणार आहे. तिला मी ओळखतो तसेच आम्ही दोघे एकमेकांच्या संपर्कात असतो, असे मेसेज पाठवू लागला. तेव्हा तिच्या पतीने याबाबत पीडितेला माहिती दिली. तसेच सासरच्या मंडळीमध्येही तिची बदनामी होऊ लागली. तिचे लग्न २१ जून २०२२ ला होणार असल्याने याबाबत  घरच्यांना चिंता वाटू लागली. कारण संबंधित व्यक्ती असे मेसेज करत तिची बदनामी करत होती. आरोपीचा शोध सुरुअखेर घरच्यांच्या तसेच मित्र मंडळीच्या सल्ल्याने तिने पोलिसांत धाव घेण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी वनराई पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. पीडितेने तिच्याबाबत आलेले मेसेज हे पोलिसांना दिले असून, ते नेमके कोणत्या डिव्हाईसवरून पाठविण्यात आले, याची चौकशी सुरू आहे. यात एकतर्फी प्रेमाचा दुवाही तपासण्यात येत आहे.

 

टॅग्स :इन्स्टाग्रामगुन्हेगारीमुंबईसोशल मीडिया