गौरी टेंबकर-कलगुटकर मुंबई : गोरेगावमध्ये भलत्याच जागेवर ‘सुरक्षा भिंत’ बांधत वृद्धाचे घर ‘म्हाडा’ने तोडले. त्यामुळे त्याच्यावर रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. दरम्यान, या अनधिकृत बांधकामाला पी दक्षिण विभागाचे अधिकारीही पाठीशी घालत असल्याचे समोर येत आहे. मात्र या दोघांच्या ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ या भूमिकेमुळे वृद्धावर बेघर होण्याची वेळ आली आहे.‘लोकमत’ने ‘म्हाडाची संरक्षक भिंत अनधिकृत’ या मथळ्याखाली २९ जानेवारी रोजी वृत्त प्रकाशित केले होते. त्यात ‘हज’साठी सौदीला गेलेल्या अन्वर दफेदार (५८) यांचे घर आणि दुकान ‘म्हाडा’ने तोडून त्यावर भिंत बांधल्याचे उघड करण्यात आले होते. त्यातच या कामासाठी ‘म्हाडा’ने कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे पालिकेच्या पी दक्षिण विभागाने दफेदार यांनी मागवलेल्या माहितीच्या अधिकारात सांगण्यात आले आहे. मात्र असे असूनही या भिंतीवर अद्याप कारवाई करण्यात पालिकेचा पी दक्षिण विभाग असमर्थ ठरत आहे. मुख्य म्हणजे या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात स्वत: पालिकेने ‘म्हाडा’च्या कार्यकारी अभियंत्यावर गुन्हा दाखल केला आहे, ते प्रकरणच आम्हाला माहीत नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे पी दक्षिणच्या संबंधित अधिकाºयांकडून देण्यात येत आहेत.>सगळ्या केसकुठे लक्षात ठेवू?मी रजेवर आहे सध्या आणि सगळ्याच केस मी कुठे लक्षात ठेवू? बाहेरगावी आलोय.- एस. नरवणकर, पी दक्षिण, सहायक अभियंता, बिल्डिंग अॅण्ड फॅक्टरी>‘साहब लोग नचा रहे है!’मंगळवारी पालिकेच्या पी दक्षिण विभागात नरवणकर यांची दफेदार यांच्याशी भेट झाली. तेव्हा त्यांनी स्वत:च्या कामाबाबत नरवणकर यांना विनंती केली. त्यानुसार म्हाडातून काही कागदपत्रे आली आहेत ती बुधवारी येऊन कनिष्ठ अभियंत्याकडून घ्या, असे नरवणकर यांनी दफेदार यांना सांगितल्याने ते बुधवारी दिवसभर पी दक्षिण विभागात हेलपाटे घालत होते.मात्र काहीच कागदपत्रे माझ्याकडे नसून तुम्ही साहेबांना भेटा असे उत्तर कनिष्ठ अभियंत्यांनी मला दिले. त्यामुळे साहेब लोक, निव्वळ मला नाचवत आहेत, या शब्दांत दफेदार यांनी ‘लोकमत’कडे व्यथा मांडली.>काय आहे प्रकरण?गोरेगावच्या मोतीलालनगर २ परिसरात १अ/१५९ या सीटीएस क्रमांकावर अन्वर दफेदार यांचे घर आणि दुकान होते. मात्र ‘म्हाडा’च्या अधिकाºयांनी या जमिनीवर असलेले त्यांचे घर आणि दुकान १७ मे, २०१६ला तोडून त्या ठिकाणी एक भिंत बनवली. जी जागा म्हाडाच्या मालकीची नसून या प्रकरणी संबंधित अधिकाºयावर २९ सप्टेंबर, २०१७ला गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तेरी भी चूप, मेरी भी चूप!,कारवाईसाठी पी दक्षिण विभागाची दिरंगाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 2:10 AM