तेरी मेरी ‘डिजिटल’ यारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 04:31 AM2017-08-06T04:31:31+5:302017-08-06T04:33:56+5:30

रक्ताच्या नात्यापेक्षाही मैत्रीचे नाते श्रेष्ठ असते, असे म्हणतात. कथा, कांदबºयांपासून नाटकासह चित्रपटांतून मैत्रीचा गोडवा कायमच गायला येतो. कितीही रुसवे फुगवे झाले

 Your my 'digital' yahoo | तेरी मेरी ‘डिजिटल’ यारी

तेरी मेरी ‘डिजिटल’ यारी

Next

रक्ताच्या नात्यापेक्षाही मैत्रीचे नाते श्रेष्ठ असते, असे म्हणतात. कथा, कांदबºयांपासून नाटकासह चित्रपटांतून मैत्रीचा गोडवा कायमच गायला येतो. कितीही रुसवे फुगवे झाले तरी ‘ही दोस्ती तुटायची नाय...’ असे म्हणत एकमेकांवर जीव ओवाळून टाकला जातो. आदी अनंत काळापासून गोडवे गायले जात असलेली ही मैत्री आज ‘डिजिटल युगा’त तेवढ्याच आत्मविश्वासने आणि खंबीरपणे पाय रोवून उभी आहे. एकविसाव्या शतकातल्या तंत्रज्ञानाने माणसाचे आयुष्यच पालटले असून, ‘विश्वास’ या एका शब्दावर ‘डिजिटल युगा’तली मैत्री आणखी बहरत आहे. अशाच काहीशी टेक्नोसेव्ही, डिजिटल मैत्रीचा आढावा ‘फ्रेंडशिप डे’च्या निमित्ताने लोकमत टीमने घेतला आहे.

मैत्रीचे कट्टे...
मैत्रीचा कट्टा म्हटले की, ‘दुनियादारी’ असे म्हटले, तरी वावगे ठरणार नाही! प्रत्येकाच्या आयुष्यात मित्र असतात. मित्राकडूनच आयुष्याची खरी दुनियादारी समजते. खºया दुनियादारीला सुरुवात होते, ती कॉलेजच्या कट्ट्यावरून... फे्रंडशिप ही आयुष्यभर असतेच, तिला साजरे करण्यासाठी एक निमित्त हवे असते, ते म्हणजे फे्रंडशिप डे चे. फे्रंडशिप डे म्हटले की, डोळ्यासमोर येते कॉलेज, लेक्चरमधली मस्ती, कॉलेजचे
कँ टिंग आणि महत्त्वाचा म्हणजे ‘कॉलेज कट्टा’.

साधारणपणे आम्ही २०११ साली रुईया महाविद्यालयात बीएमएमला प्रवेश घेतला. त्यानंतर, आम्ही सर्व मित्र एकत्र आलो. कट्ट्यावर बसायला सुरुवात झाली. कट्ट्यावर एक ा मित्राची ओळख झाली, त्याची ‘नयन फाउंडेशन’ संस्था आहे. नयन फाउंडेशनमार्फत अंध मुलांसाठी विविध उपक्रम, कार्यक्रम राबविले जातात. या मित्राबरोबर ओळख होऊन, मग आम्ही त्याच्या संस्थेशी जोडले गेलो. अंध मुलांची दहीहंडी पथक, ट्रेकिंग करणे इत्यादी उपक्रम राबवायला लागलो. त्यामुळे आमच्यासाठी रुईया कट्टा हा विशेष कट्टा आहे. कट्ट्यामुळे आमच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली. सर्व रुईया महाविद्यालयाचे श्रेय आहे. याच्यामुळेच आम्ही सामाजिक कार्यात जोडले गेलो.रुईया कट्ट्यावर गेल्यावर नवी ऊर्जा मिळते.
- शार्दुल म्हाडगुत, सदस्य, रुईया कट्टा

जीवलग मित्र मिळाला
मी दहावीत असताना, माझी आणि तुषारची फेसबुकवर मैत्री झाली. आमच्या मैत्रीला आता ४ वर्षे झाली आहेत. आमच्या मैत्रीत फेसबुकचा मोठा वाटा आहे. आता आमची घट्ट मैत्री झाली असल्याने, आम्ही अनेकदा भेटतो. ट्रेकिंग, फोटोशूट, क्लबिंग, नाइट आउट, डिनर आणि पिकनिक कुठेही जायचे असेल, तर त्याला सोबत घेऊन जाते. आम्ही अनेकदा भांडतो, भांडल्यानंतर दुसºया दिवशी पुन्हा नॉर्मल होतो. आज फ्रेंडशिप डेच्या दिवशी मी एवढेच म्हणेन की, लेट्स चिअर्स फॉर अवर ४ ईअर्स आॅफ फ्रेंडशिप, मेनी मोअर ईअर्स टू गो!
- वृशाली कुंभावडे


आम्ही वेळात वेळ काढून भेटत असतो. माझे बरेच मैत्रीचे गु्रप आहेत, परंतु त्यातला जवळचा गु्रप हा फोटोग्राफीचा गु्रप आहे. फोटोग्राफी गु्रपमध्ये काही मीडियाचे आहेत, तर काही वाइल्ड फोटोग्राफर आहेत. आमची मैत्री ही फेसबुकमार्फत झाली. गु्रपमध्ये पराग सावंतसारखा मित्र वेगवेगळ््या विषयाचे व्हिडीओ तयार करत असतो. त्यातून आम्ही समाज प्रबोधन करत असतो. आम्ही भेटलो की, सर्वात पहिली चर्चा ही प्रोफेशनवर केली जाते. प्रत्येकाने काढलेले फोटो एकमेकांना शेअर केले जातात. गु्रपमधील सर्व लोक ‘भुक्कड’ आहेत. भेटल्यावर सर्वात पहिले काय खायचे, यावर चर्चा केली जाते, तसेच गु्रपमध्ये काही मुलीदेखील आहेत. त्या घरातून येताना काही ना काही तरी बनवून घेऊन येतात. पत्रकार मंडळीदेखील गु्रपमध्ये सामील आहेत. सामाजिक विषयांवर चर्चा केली जाते. त्यातून आपल्याकडून व्हिडीओच्या माध्यमातून किंवा फोटोच्या माध्यमातून समाज प्रबोधन कसे करता येईल, याकडे गु्रपचा कल असतो. - अभिषेक साटम, सदस्य, क्लिकर कट्टा

कधीतरी एखाद्या दिवशी जुनी वही सापडते आणि शाळेतल्या आठवणी ताज्या होतात. तसंच काहीसं माझं झालं, जेव्हा मला माझ्या शाळेतील मित्र-मैत्रिणी मिळाले. माझ्या वर्गातील मित्र नितीन भिसे व शिरीष मुळेकर यांनी पुढाकार घेऊन सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे सहज संपर्क साधून व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक, इंटरनेट, मोबाइलच्या माध्यमातून शोध मोहिमेद्वारे वांद्रे पूर्व येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या १९७६च्या बॅचमधील सर्व विद्यार्थ्यांना एकत्र आणले व जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला. त्या वेळचे विद्यार्थी आजकालसारख्या मोकळ्या वातावरणात वावरत नव्हते. क्वचितच आम्ही वर्गात एकमेकांशी बोलत असू. मात्र सध्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्या शाळेतील १९७६ च्या बॅचचे सुमारे ९० माजी विद्यार्थी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून रोज सुमारे १६ ते १८ तास संपर्कात असतो. तब्बल ३० ते ३२ वर्षांनी आम्ही एकत्र भेटून २००८ पासून स्नेहसंमेलन साजरे करू लागलो.
- आरती भाटकर, माजी विद्यार्थिनी, न्यू इंग्लिश स्कूल, वांद्रे पूर्व

लालबाग गणेशोत्सव मंडळाचा रक्तदान शिबिर सुरू होत असल्याचे कळले. तेव्हा रक्तदान शिबिरात भाग घेण्याचे आम्ही ठरविले. जेव्हा आम्हाला समजले की, आमचे रक्त हे जम्मू-काश्मीर येथील सैनिकांना दिले जाणार आहे. त्या वेळी आमच्या मनात देशभक्तीची एक ज्योत पेटली. तेव्हा आम्ही निर्णय केला की, आपण पण रक्तदान करायचे. आम्ही कट्ट्यावर एकत्र जमून प्रत्येकाच्या आयुष्यात काय-काय चालू आहे, तसेच विविध नोकºयांसंबंधी आम्ही कट्ट्यावर चर्चा करत असतो. ग्रुपमधील सर्व आता नोकरी धंद्याला लागलेले आहेत. त्यामुळे महिन्यातून एकदा वेळात वेळ काढून कट्ट्यावर भेटतो. फिरायला कुठे जायचे, चित्रपट कोणता पाहायचा इत्यादी ठिकाणे ठरवित असतो. आमच्या ग्रुपमधील एक मित्र पुण्यात राहायला गेला आहे. त्यामुळे त्याची आणि आमची भेट वर्षातून एकदाच होते, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून रोज बोलणे होते.
- रक्षंदा शिगवण, सदस्य, डीएमएसएस कट्टा.

आमच्या ग्रुपमधील ५० टक्के मुले ही नोकरी व्यवसायात आहेत. आमचा कट्टा कॉलेजच्या बाहेरील बाजूस सँडविचवाला आहे; तिथे आमचा कट्टा एकत्र जमतो. कट्ट्यावर चालू घडामोडी विषयीच्या चर्चा रंगत असतात. त्या वेळी एकमेकांचे वादविवाद आणि छोटी-छोटी भांडणे यात खूप धम्माल असते, तसेच नोकरीच्या विविध संधी कुठे-कुठे उपलब्ध आहेत, त्यावरदेखील चर्चा केली जाते. एकमेकांना चिडविणे आणि टवाळकी करणे इत्यादी प्रकारचीदेखील मजा-मस्ती ग्रुपमध्ये सुरू असते. आठवड्यातून एकदा पार्टी असते. आमचा ग्रुप हा खवय्या आहे. त्यामुळे एकत्र जमून लंच किंवा डिनरला जाण्याचा प्लान केला जातो. आम्ही प्रत्येकाच्या क्षेत्रातील कामही एकमेकांना नेहमी शिकवित असतो. सोशल अ‍ॅक्टिव्हिटिज्मध्ये भाग घेत असतो. - विनय शिंदे, सदस्य, फनचायत कट्टा

आमचा कट्टा हा पंडित शेवपुरीवाला दुकानाच्या पाठीमागे रंगतो. तिथे जमल्यावर शेवपुरी खाऊन कट्ट्याची रंगत वाढते. दिवसभरात काय केले, त्यासंंबंधी गंमत जंमत शेअर करतो, तसेच आमचा व्हॉट्सअ‍ॅप गु्रप आहे, त्याचे नाव ‘कट्ट्यावरील मैत्री’ आहे. कट्ट्यावर आम्ही एकूण सात मित्र. कॉलेज संपल्यावर रोज कट्ट्यावर जमतो. ग्रुपमध्ये कोणालाही प्रोब्लेम आला, तर आम्ही सर्व जण मदतीला धावून जातो. - हृषिकेश फापाळे, सदस्य, स्पेशल कट्टा

दोन डान्सर्स
एकत्र आल्या
इन्स्टाग्रामवर नेहमीच अनोळखी मुलांच्या कित्येक रिक्वेस्ट येतात, पण एके दिवशी एका अनोळखी मुलीची रिक्वेस्ट आली. ती मुलगी अतिशय गोड दिसली. तिचे फोटो पाहून विलंब न लावता मी ती अ‍ॅक्सेप्ट केली आणि मग सायलीसोबत मैत्री झाली. आम्ही दररोज चॅटिंग करू लागलो. आम्ही दोघीही डान्सर असल्याने स्वत:चे डान्सचे व्हिडीओ शेअर करू लागलो. एका डान्स कॉम्पिटिशनच्या निमित्ताने भेटलो आणि त्या स्पर्धेत सहभाग घेतला. ५ वर्षे झाली आमच्या मैत्रीला आणि आता आम्ही बेस्ट फ्रेंड्स आहोत. आम्ही एकत्र एखाद्या स्पर्धेत भाग घेऊन ती स्पर्धा जिंकावी, अशी इच्छा आहे.
- श्रद्धा सकपाळ, चुनाभट्टी

बेस्ट फ्रेंड मिळाला
सिद्धेश माझा फेसबुक फ्रेंड होता, त्याला मी ओळखतही होते, पण मी कधी त्याच्याशी बोलत नव्हते. तो स्केच खूप छान काढतो. मी त्याला तसे कधी सांगितले नाही. कॉलेजच्या एका प्रोजेक्टच्या निमित्ताने मला त्याच्या स्केचची गरज पडली. १८ जानेवारी या दिवशी मी त्याला पहिल्यांदा मेसेज केला. त्याच्या स्केचचे कौतुक केले. प्रोजेक्टसाठी त्याची मदत मागितली, त्याने मला स्केचेस काढून दिले. आमच्या आॅनलाइन मैत्रीला आता सहा महिने झाले आहेत. त्याची ताई आता माझ्या घराजवळ राहत असल्यामुळे तो नेहमी ताईकडे येतो, त्यामुळे आमच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. तरीही आम्ही प्रत्यक्षात जितके बोलतो, त्याहीपेक्षा जास्त आॅनलाइन बोलतो. आम्ही चांगल्या-वाईट सगळ्या गोष्टी एकमेकांना सांगतो.
- सायली तेली, कांदिवली

इन्स्टाग्रामवरचे आम्ही मित्र
इन्स्टाग्रामवर त्याने रिक्वेस्ट पाठवली. म्युच्युअल फ्रेंड्स खूप होते, म्हणून मी त्याची रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट केली. कमेंट्स आणि चॅटच्या माध्यमातून बोलणे सुरू झाले. त्यानंतर, आमची फ्रेंडशिप झाली. अनेकांची मैत्री फेसबुक टिष्ट्वटरवर होते, पण आमची मैत्री ही इन्स्टाग्रामवर झाली. चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या पाटपूजन सोहळ्याला मी गेले होते. तेव्हा तिथे तोही आला होता. त्याने हाक मारली. कोणताही संभ्रम न ठेवता मीही त्याच्याशी बोलले. आता तो अनोळखी मित्र राहिला नव्हता. आम्ही आमचे व्हॉट्सअ‍ॅप नंबर एकमेकांना दिले. त्यानंतर, आम्ही दररोज खूप वेळ चॅट करतो.
- कादंबरी डोंगरे,

 

Web Title:  Your my 'digital' yahoo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.