‘आपली सुरक्षा, आपल्या हाती’

By admin | Published: April 14, 2016 04:12 AM2016-04-14T04:12:32+5:302016-04-14T04:12:32+5:30

लोकसंख्येपुढे अग्निशमन दलाची ताकद तोकडी पडत असल्याने आपल्या सुरक्षेची जबाबदारी स्वत:च उचलण्याची वेळ मुंबईकरांवर आली आहे़ यामुळे अग्निशमन सप्ताहानिमित्त स्वयंसेवकांची

'Your safety, in your hands' | ‘आपली सुरक्षा, आपल्या हाती’

‘आपली सुरक्षा, आपल्या हाती’

Next

मुंबई : लोकसंख्येपुढे अग्निशमन दलाची ताकद तोकडी पडत असल्याने आपल्या सुरक्षेची जबाबदारी स्वत:च उचलण्याची वेळ मुंबईकरांवर आली आहे़ यामुळे अग्निशमन सप्ताहानिमित्त स्वयंसेवकांची फौजच तयार करण्यात येणार आहे़ ‘आपली सुरक्षा आपल्या हाती’ असा संदेशही नागरिकांना देण्यात येणार आहे़
मुंबईत दररोज चार हजार ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडतात़ अनेक वेळा वाहतूककोंडीमुळे तर कधी चिंचोळ्या मार्गामुळे आगीचे बंब घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होतो़ अशा वेळी अग्निशमन दलाची मदत पोहोचेपर्यंत नागरिक स्वत:ची मदत स्वत:च करू शकतात़ याचे प्रशिक्षणही या मोहिमेतून इच्छुक स्वयंसेवकांना देण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)

शहिदांचे स्मरण
दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानला हुसकावून लावण्यासाठी व्हिक्टोरिया गोदीत उभ्या असलेल्या बोटीतून शस्त्रे आणण्यात आली होती. १४ एप्रिल १९४४ रोजी या बोटीत स्फोट झाला. ही आग विझवताना दलाचे ६६ जवान मृत्युमुखी पडले. या दिवसाची स्मृती म्हणून १४ ते २० एप्रिल हा अग्निशमन सप्ताह म्हणून पाळण्यात येतो.

नागरिकांना प्रशिक्षण देण्याची गरज
या वर्षी नागरिकांनाच सतर्क व आपत्तीचा सामना करण्यासाठी सज्ज करण्यात येणार आहे़ त्यानुसार आपली सुरक्षा आपल्या हाती हा संदेश अग्निशमन दलाने दिला आहे़ तुमची मदत करण्यास आम्हाला मदत करा, असा संदेश अग्निशमन दलाने या वर्षी दिला आहे़ आपत्ती काळात आपले व आपल्या आप्तेष्टांचे प्राण कसे वाचवता येतील याचे प्रशिक्षण असल्यास मुंबईत दुर्घटनांमध्ये बळींची संख्या कमी असेल, असा विश्वास अग्निशमन दलास वाटतो आहे़

अग्निशमन दलासाठी ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर
अग्निशमन दलाने पहिल्यांदाच ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर निश्चित करण्यात आला आहे़ यासाठी अलीकडच्या काळात गाजत असलेला रणदीप हुडा याची निवड करण्यात आली आहे़ गुरुवारपासून रणदीप जनजागृती मोहिमेला सुरुवात करणार आहे़ या जागृतीमुळे अग्निशमन दलातील स्वयंसेवकांची संख्या सात हजारांवरून ७० हजारपर्यंत पोहोचेल, असा पालिकेचा अंदाज आहे़

Web Title: 'Your safety, in your hands'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.