Join us  

‘आपली सुरक्षा, आपल्या हाती’

By admin | Published: April 14, 2016 1:37 AM

लोकसंख्येपुढे अग्निशमन दलाची ताकद तोकडी पडत असल्याने आपल्या सुरक्षेची जबाबदारी स्वत:च उचलण्याची वेळ मुंबईकरांवर आली आहे़ यामुळे अग्निशमन सप्ताहानिमित्त स्वयंसेवकांची

मुंबई : लोकसंख्येपुढे अग्निशमन दलाची ताकद तोकडी पडत असल्याने आपल्या सुरक्षेची जबाबदारी स्वत:च उचलण्याची वेळ मुंबईकरांवर आली आहे़ यामुळे अग्निशमन सप्ताहानिमित्त स्वयंसेवकांची फौजच तयार करण्यात येणार आहे़ ‘आपली सुरक्षा आपल्या हाती’, असा संदेशही नागरिकांना देण्यात येणार आहे़नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी आगीशी झुंज देणाऱ्या अग्निशमन दलावर याव्यतिरिक्तही अनेक छोट्याछोट्या कामांचा भार असतो़ झाड पडणे, चौपाटीवरील सुरक्षा, प्राणी पक्ष्यांची सुरक्षा, आपत्कालिन समस्या आदी असंख्य कामांची जबाबदारी अग्निशमन दलाच्या जवानांवर असते़ त्यामुळे आधीच अपुऱ्या असलेल्या या यंत्रणेची तारेवरची कसरत सुरू असते़मुंबईत दररोज चार हजार ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडतात़ अनेकवेळा वाहतूककोंडीमुळे तर कधी चिंचोळ्या मार्गामुळे आगीचे बंब घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होतो़ अशावेळी अग्निशमन दलाची मदत पोहोचेपर्यंत नागरिक स्वत:ची मदत स्वतच करू शकतात़ याचे प्रशिक्षणही या मोहिमेतून इच्छुक स्वयंसेवकांना देण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)शहिद अग्निशमन जवानांचे स्मरणदुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानने ब्रम्हदेशाचा ताबा घेतल्याने त्यांना हुसकावून लावण्यासाठी व्हिक्टोरिया गोदीत उभ्या असलेल्या बोटीतून शस्त्र आणण्यात आली होती.१४ एप्रिल १९४४ रोजी व्हिक्टोरिया गोदीत उभ्या असलेल्या या बोटीत मोठा स्फोट झाला. ही आग विझवताना अग्निशमन दलाचे ६६ जवान मृत्यूमुखी पडले. या दिवसाची स्मृती म्हणून १४ ते २० एप्रिल हा अग्निशमन सप्ताह म्हणून पाळण्यात येतो. नागरिकांना प्रशिक्षण देण्याची गरजगेल्या वर्षी अग्निशमन सुरक्षा सप्ताह म्हणून पाळण्यात आला होता़ यावर्षी नागरिकांनाच सतर्क व आपत्तीचा सामना करण्यासाठी सज्ज करण्यात येणार आहे़ त्यानुसार आपली सुरक्षा आपल्या हाती हा संदेश अग्निशमन दलाने दिली आहे़ मदतीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहू नका़ तुमची मदत करण्यास आम्हाला मदत करा, असा संदेश अग्निशमन दलाने यावर्षी दिला आहे़ आपत्ती काळात आपले व आपल्या आप्तेष्टांचे प्राण कसे वाचवता, येतील याचे प्रशिक्षण असल्यास मुंबईत दुर्घटनांमध्ये बळींची संख्या कमी असेल, असा विश्वास अग्निशमन दलास वाटतो आहे़अग्निशमन दलासाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडरअग्निशमन दलामध्ये स्वयंसेवकांची फौज तयार करण्यासाठी पहिल्यांदाच ब्रँड अ‍ॅम्बेसेडर निश्चित करण्यात आला आहे़ यासाठी अलीकडच्या काळात गाजत असलेला रणदीप हुडा याची निवड करण्यात आली आहे़ गुरुवारपासून रणदीप जनजागृती मोहिमेला सुरुवात करणार आहे़ या जागृतीमुळे अग्निशमन दलातील स्वयंसेवकांची संख्या सात हजारांवरून ७० हजार पर्यंत पोहोचेल, असा पालिकेचा अंदाज आहे़