अन् मरीन लाइनवरील तरुणाईने भुवया उंचावल्या, फोटो क्रेडीट राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
By महेश गलांडे | Published: December 15, 2020 12:29 PM2020-12-15T12:29:57+5:302020-12-15T12:32:14+5:30
मुंबईतील सी लिंक परिसरात सायंकाळी फिरण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री दत्तात्रय भरणे निघाले होते. त्यावेळी, अचानक तेथील एका ग्रुमधील तरुणांनी ग्रुपफोटो घेण्यासाठी आवाज दिला.
मुंबई - राजधानी मुंबई फिरायला गेलेला माणूस गेट वे ऑफ इंडिया आणि सी लिंक पाहिल्याशिवाय मुंबईची सैरच पूर्ण करत नाही. सी लिंकवर सकाळपासून रात्रीपर्यंत पर्यटकांचीस जोडप्यांची, मित्र-मैत्रिणींची मैफिल जमलेली असता. कायम वर्दळ असलेला गर्दीचा परिसर म्हणजे सी लिंक. मॉर्निक आणि इव्हिनिंग वॉकसाठीही मुंबईकर येथे आवर्जून येतात. सी लिंकवर जमलेल्या एशाच एका ग्रपमधील तरुणांनी आपला ग्रुप फोटो घेण्यासाठी चक्क मंत्रिमहोदयांनाच साद घातली अन् राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही मोबाईल घेऊन क्लिक केला.
मुंबईतील सी लिंक परिसरात सायंकाळी फिरण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री दत्तात्रय भरणे निघाले होते. त्यावेळी, अचानक तेथील एका ग्रुमधील तरुणांनी ग्रुपफोटो घेण्यासाठी आवाज दिला. विशेष म्हणजे ती साद चक्क राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना घातली होती. दत्तात्रय भरणे यांनीही लगेच त्या तरुणांकडून मोबाईल घेऊन त्यांचा ग्रुप फोटो घेतला. त्यानंतर, आपण चक्क महाराष्ट्राच्या मंत्री महोदयांनाच आपला फोटो काढायला सांगितल्याचे समजताच, त्या तरुणांच्या भुवया उंचावल्या. दत्तात्रय भरणे यांचा साधेपणा आण सहजता पाहून ही तरुणाई भारावली. त्यानंतर, भरणे मामांसमवेत एक फोटो घेण्याचा मोह आवरला नाही. यासंदर्भात दत्तात्रय भरणे यांनी स्वत: ट्विट करुन माहिती दिली आहे.
आज विधिमंडळाचे कामकाज आटपून मी, आ.@AshutoshAKale व आदी मान्यवरांच्या सोबत सायंकाळच्या वेळी मरीन ड्राईव्ह ला फेरफटका मारत होतो. अचानक मला मुलांनी आवाज दिला आणि आमचा सर्व मित्रांचा एक फोटो काढा अशी विनंती केली. मला सहज माझे तरुण असतानाचे मित्रांच्या सोबतचे दिवस आठवले. मी त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांचे फोटो, त्यांच्या जीवनातील अनमोल क्षण कैद केले. अचानक माझा फोटो आ. अशितोश काळे यांनी काढला. त्या नंतर मुलांना समजले की आपण महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांना सांगितले होते. त्यांनी सोबत एक फोटो आपण पण काढुया अशी विनंती केली. त्यांच्या आनंदात मला सहभागी होता आले याचा मनापासून आनंद वाटला, असे ट्विट दत्तात्रय भरणे यांनी केलं.
आज विधिमंडळाचे कामकाज आटपून मी, आ.@AshutoshAKale व आदी मान्यवरांच्या सोबत सायंकाळच्या वेळी मरीन ड्राईव्ह ला फेरफटका मारत होतो. अचानक मला मुलांनी आवाज दिला आणि आमचा सर्व मित्रांचा एक फोटो काढा अशी विनंती केली. मला सहज माझे तरुण असतानाचे मित्रांच्या सोबतचे दिवस आठवले. pic.twitter.com/oMljq8N3Ic
— Dattatray Bharane (@bharanemamaNCP) December 14, 2020
दरम्यान, यापूर्वीही आपल्या इंदापूर तालुक्यातील मुलांसमवेत सुरफाट्या खेळताना मंत्री दत्तात्रय भरणे दिसले होते. भरणे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यांच्यातील साधेपणा आणि सहजता आजही अनेकांना भावते.
त्यांनी सोबत एक फोटो आपण पण काढुया अशी विनंती केली. त्यांच्या आनंदात मला सहभागी होता आले याचा मनापासून आनंद वाटला.
— Dattatray Bharane (@bharanemamaNCP) December 14, 2020