रेल्वे तिकिटाचा काळा बाजार करणाऱ्या तरुणास अटक
By नितीन जगताप | Updated: October 16, 2023 21:18 IST2023-10-16T21:17:31+5:302023-10-16T21:18:03+5:30
रेल्वे कायदा १४३ अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेल्वे तिकिटाचा काळा बाजार करणाऱ्या तरुणास अटक
मुंबई: रेल्वे तिकिटांचा काळाबाजार केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक रेल्वेच्या पथकाने अटक केली असून संदीप चरकारी असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून ३३ हजारांचे तिकीट जप्त करून त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप चरकारी हा अनधिकृतपणे रेल्वे तिकीट विक्री करत होता. मुंबई विभागातील वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक रॉबिन कालिया यांच्या नेतृत्वाखालील पथकाने चरकरी याच्या चुनाभट्टी येथील घरी छापा टाकला. त्यावेळी त्याच्याकडे नेक्सस नावाचे बेकायदेशीर सॉफ्टवेअर आढळले.त्याचा वापर करून तो तिकीट आरक्षण करत होता. त्याच्याकडे १७ क्रमांकाची ई तिकिटे सापडली. त्याच्याकडे ६४ युजर आयडी होते. तसेच ३३१८७ रुपयांची अवैध तिकिटे होती. त्याला वडाळा आरपीएफकडे सोपविण्यात आले असून रेल्वे कायदा १४३ अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.