Join us

युवापिढीच बदल घडवेल

By admin | Published: January 17, 2016 1:33 AM

परिस्थितीत बदल व्हावा असे प्रत्येकाला वाटते. केवळ वाटण्यावरच ही गोष्ट साध्य होण्याइतकी सोपी नाही. मी जेव्हा तुमच्या वयाचा होतो; तेव्हा मलाही असेच वाटत होते.

मुंबई : परिस्थितीत बदल व्हावा असे प्रत्येकाला वाटते. केवळ वाटण्यावरच ही गोष्ट साध्य होण्याइतकी सोपी नाही. मी जेव्हा तुमच्या वयाचा होतो; तेव्हा मलाही असेच वाटत होते. एका दिवसांत बदल घडत नसतो. त्यासाठी काही कालावधी लागतो आणि आपल्यासारखे तरुणच बदल घडवू शकतात. युवापिढीतच हे सामर्थ्य आहे. असे राहूल गांधी यांनी एनएमआयएमएसच्या विद्यार्थ्यांसोबत घेतलेल्या भेटीत सांगितले.सुरक्षेबाबत सरकार निष्क्रीय पठाणकोट हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नावर राहुल यांनी केंद्रावर निशाणा साधला. काँग्रेसचे सरकार असताना भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतीपूर्ण चर्चा करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले होते. शिवाय देशाच्या सुरक्षेवरही भर दिला होता. मात्र विद्यमान सरकार देशाच्या सुरक्षेप्रश्नी निष्क्रीय ठरले आहे.कष्टकऱ्यांच्या हातांनीच ‘मेक इन इंडिया’ शक्य दोन चार उद्योगपतींना हाताशी धरुन ‘मेक इन इंडिया’ साकारणार नाही. त्यासाठी धारावीसारख्या वस्त्यांमध्ये राबणाऱ्या सामान्यांचे हात मजबूत करावे लागतील. हेच हात चीनशी स्पर्धा करत मागे टाकतील, असे सांगत राहुल गांधी यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली. वाढत्या वीजदराबाबत मुंबई काँग्रेसने आयोजित केलेल्या पदयात्रेचे नेतृत्व शनिवारी राहुल गांधी यांनी केले. वांद्रे बॅण्डस्टँड येथून निघालेली पदयात्रा धारावीत संपली. धारावी म्हणजे मिनी इंडिया...तमिळनाडूपासून बिहारपर्यंत विविध राज्य, विविध धर्मातील लोक या धारावीत आहेत. एकप्रकारे ही धारावी म्हणजे मिनी इंडियाच आहे. सर्वांना सामावून घेणाऱ्या काँग्रेसचे दुसरे रुप असल्याचे राहुल म्हणाले.