गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीचे आमीष दाखवत तरुणाला 4 लाखांना गंडवले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 10:00 PM2018-08-07T22:00:46+5:302018-08-07T22:02:27+5:30

देशात इंजिनिअर, डॉक्टर, हॉटेल मॅनेजमेंट, उच्च पदवीधर झाल्यानंतर आपणास गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळावी यासाठी अनेक तरुण प्रयत्नशील असतात. यात बहुतांशजण देशात काम करण्यापेक्षा परदेशात जाऊन अधिक पैसा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात.

youth cheated by phone calls for 4 lack rupees by fake job racket | गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीचे आमीष दाखवत तरुणाला 4 लाखांना गंडवले

गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीचे आमीष दाखवत तरुणाला 4 लाखांना गंडवले

Next

मुंबई - देशात इंजिनिअर, डॉक्टर, हॉटेल मॅनेजमेंट, उच्च पदवीधर झाल्यानंतर आपणास गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळावी यासाठी अनेक तरुण प्रयत्नशील असतात. यात बहुतांशजण देशात काम करण्यापेक्षा परदेशात जाऊन अधिक पैसा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र, अशा तरुणांना हेरून त्यांना परदेशात नामांकित कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. नुकतीच भांडुपमधील 29 वर्षीय तरुणाला इंडिगो एअरलाईन्समध्ये चांगल्या पगाराची नोकरी देण्याच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी तब्बल 4 लाख 96 हजार 419 रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. 

भांडुपच्या उषा को. ऑप. सोसायटीत आपल्या आईसह राहणारा राहुल सुब्रोतो रॉय या 29 वर्षीय तरुणाने चांगल्या नोकरीसाठी ऑक्टोंबर 2017 मध्ये त्याचा बायोडेटा नोकरी डॉट कॅाम साईटवर अपलोड केला होता. मात्र, मधल्यावेळात कित्येक महिने उलटल्यानंतर मार्च 2018 मध्ये राहुलला दिल्लीच्या जॉब सोल्युशन एजन्सीतून नंदीनी नावाच्या तरुणीने फोन केला. त्यावेळी तरुणीने नोकरी डॉट कॉमवर राहुलचा बायोडेटा मिळाल्याचे सांगितले. त्यावेळी तिने तिच्या कंपनीतर्फे राहुलला इंडिगो एअरलाईन्स आणि जेट ऐअरव्हेज कंपनीत नोकरी देण्याचे आमिष दाखवून प्रोसेसिंग फी 18 हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार राहुलने संबधित कंपनीच्या खात्यावर प्रोसेसिंग फी भरली. त्यानंतर संबधित कंपनीने 26 मार्च रोजी राहुलने कंपनीतर्फे दिलेली ऑनलाईन परीक्षा पास झाल्याचे कळवले. त्यानंतर कागदपत्रे पडताळणीसाठी पुन्हा नंदिनीने 7 हजार पाचशे रुपये भरण्यास सांगितले. 28 मार्च रोजी नेहा नावाच्या एका तरुणीचा पुन्हा राहुलला फोन आला. त्यावेळी तिने इंडिगो एअरलाईन्स कंपनीची मॅनेजर बोलत असल्याचे सांगितले. त्यावेळी तिने जॉब सिक्यूरिटी म्हणून पुन्हा 15 हजार रुपये भरण्यास सांगितले. ही रक्कम भरल्यानंतर राहुलच्या खात्यावर nehasingh@goindigo.in या नावाने मेल आला. त्यामध्ये राहुलच्या नावाने इंडिगो एअरलाईन्सच्या कंपनीचे ऑफर लेटर होते. 2 एप्रिल 2018 रोजी पुन्हा नंदीनीने फोन करुन ट्रेनिंग सिक्युरिटी अनामत रक्कम 25 हजार 500 रुपये भरण्यास सांगितली. त्यानंतर ऑफर लेटरला पासवर्ड देण्यात आल्याने 3 एप्रिल रोजी पुन्हा त्यासाठी 45 हजार रुपये भरण्यास सांगितले. त्याचदिवशी दुपारी नंदिनीने राहुलला फोन करुन एम्पलाँयमेंट आय.डी. व एअरपोर्ट टर्मिनल पाससाठी 39 हजार रुपये भरण्यास सांगितले. तर, 5 एप्रिल रोजी 55 हजार 500 रुपये जॉब सोल्युशनच्या नावाखाली भरण्यास सांगितले. अशा प्रकारे राहुलकडून तब्बल 4 लाख 96 हजार 419 रुपये उकळले. पुढील जॉईनिंग डेट साठी राहुलने नंदीनीशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता. तिचा फोन बंद येत होता. याबाबत राहुलने इंडिको कंपनीकडे चौकशी केल्यानंतर त्याला आपली फसवणूक झाल्याचे कळाले. याप्रकरणी राहुलने भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Web Title: youth cheated by phone calls for 4 lack rupees by fake job racket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.