वाशीत लॉजमध्ये तरुणाची आत्महत्या
By admin | Published: September 22, 2014 01:01 AM2014-09-22T01:01:46+5:302014-09-22T01:01:46+5:30
जुहूगाव येथील लॉजमध्ये महादेव घुगे (२४) या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली
नवी मुंबई : जुहूगाव येथील लॉजमध्ये महादेव घुगे (२४) या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हा तरुण कोपरखैरणे येथे राहणारा असून त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
रियल इस्टेटचा व्यवसाय करणारा घुगे हा कोपरखैरणे गाव येथे राहणारा आहे. शनिवारी मध्यरात्री त्याने जुहूगाव येथील दर्शन लॉजमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. शनिवारी रात्री ११ वाजता तो या लॉजमध्ये एकटाच आला होता.
रविवारी सकाळी सफाई कामगाराने खोलीच्या सफाईसाठी दरवाजा ठोठावला.परंतु घुगे याने आतून दरवाजा उघडा नाही. अखेर लॉजचे मालक पुर्नेश शेट्टी यांनी दरवाजा तोडला. यावेळी आतमध्ये महादेव घुगे याचा मृतदेह आढळून आला. पंख्याला चादर बांधून गळफास लावून जीवन संपवले. परंतु त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती यमगर यांनी सांगितले. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)