Join us

जन प्रहार फाउंडेशनच्या रक्तदान शिबिराला उतरली तरुणाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 4:06 AM

मुंबई : अंधेरी पूर्व येथील श्रीलक्ष्मीनारायण हॉलमध्ये जन प्रहार फाउंडेशन, महाराष्ट्र रुग्णसेवक आणि श्रमिक कामगार संघटना तसेच ‘लोकमत’च्या संयुक्त ...

मुंबई : अंधेरी पूर्व येथील श्रीलक्ष्मीनारायण हॉलमध्ये जन प्रहार फाउंडेशन, महाराष्ट्र रुग्णसेवक आणि श्रमिक कामगार संघटना तसेच ‘लोकमत’च्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. पावसामुळे रक्तदान शिबिरात व्यत्यय आला. रविवारी पार पडलेल्या या रक्तदान शिबिराला तरुणाई आणि बचत गटातील महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

लोकमतचे संस्थापक स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र रुग्णसेवक आणि श्रमिक कामगार संघटनेचे राज्य सचिव तसेच जन प्रहार वैद्यकीय साहाय्यता कक्ष प्रमुख भीमेश नरसप्पा मुतुला यांनी येथे रक्तदान शिबिराच्या आयोजनासाठी विशेष पुढाकार घेतला होता. तर सेंट जॉर्ज हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आकाश खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली या रक्तपेढीचे या रक्तदान शिबिराला मोलाचे सहकार्य लाभले.

येथील रक्तदान शिबिराचे फीत कापून आणि दीप प्रज्वलन करून उद्घाटन झाले. या वेळी महाराष्ट्र रुग्णसेवक आणि श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण भोटकर, जन प्रहार फाउंडेशनचे अध्यक्ष रविकांत सर्वदानंद शुक्ला, महाराष्ट्र रुग्णसेवक आणि श्रमिक कामगार संघटनेचे राज्य सचिव आणि जन प्रहार वैद्यकीय साहाय्यता कक्ष प्रमुख भीमेश नरसप्पा मुतुला, जन प्रहार फाउंडेशनचे सचिव संजीवकुमार कलकोरी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी तरुणा कुंभार, रूपा शेलार, भारती वाकचौरे, सविता कुंभार, रूपाली खोपे, प्रियंका मोरे, दिशा सावंत, सुहासिनी पोद्दार, उस्मान पठाण, विलास दुडये, जितू सिंग, श्री कुंभार, विजय मलिक, संतोष बरला, हरीश यादव यांनी मेहनत घेतली.

फोटो ओळी

रक्तदान शिबिराप्रसंगी सहभागी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देताना महाराष्ट्र रुग्णसेवक आणि श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण भोटकर. या वेळी जन प्रहार फाउंडेशनचे अध्यक्ष रविकांत सर्वदानंद शुक्ला, महाराष्ट्र रुग्णसेवक आणि श्रमिक कामगार संघटनेचे राज्य सचिव आणि जन प्रहार वैद्यकीय साहाय्यता कक्ष प्रमुख भीमेश नरसप्पा मुतुला आदी.