मुंबई : भरधाव रिक्षाच्या धडकेत विनित देसाई (४५) या स्विमिंग कोचचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली.
विनित हे जोगेश्वरी पूर्व येथील शंकरवाडी बसस्टॉपवर झेब्रा क्रॉसिंगवरून रस्ता ओलांडत होते. याचदरम्यान अंधेरीकडून बोरीवलीच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या एका रिक्षा चालकाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात विनित यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दरम्यान, अपघातानंतर रिक्षा चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.
रिक्षाचालकावर गुन्हास्थानिकांच्या मदतीने दुसऱ्या रिक्षाने विनित यांना ट्रामा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तेथे त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी विनित यांची आई जयश्री यांनी तक्रार दिल्यानंतर अज्ञात रिक्षा चालकाविरोधात जोगेश्वरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.