युवा फाउंडेशनकडून १५० गरजू कुटुंबांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:06 AM2021-05-11T04:06:37+5:302021-05-11T04:06:37+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क मुंबई : लॉकडाऊनमुळे अनेकांची आर्थिक स्थिती सध्या बिकट झाली आहे. अशा १५० हून अधिक गरजू कुटुंबांना ...

Youth Foundation helps 150 needy families | युवा फाउंडेशनकडून १५० गरजू कुटुंबांना मदत

युवा फाउंडेशनकडून १५० गरजू कुटुंबांना मदत

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : लॉकडाऊनमुळे अनेकांची आर्थिक स्थिती सध्या बिकट झाली आहे. अशा १५० हून अधिक गरजू कुटुंबांना १ महिन्याची रेशन किट्सचे वाटप युवा फाउंडेशन या अशासकीय संस्थेने केले.

युवा फाउंडेशनने आर्ट ऑफ लिव्हिंगचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते अमोल वागळे यांची टीम, प्रग्या प्रबोधिनी स्कूल, स्वामी आदारवार्धिनी आणि रिवाईव क्लिनिक यांच्या सहकार्याने गोरेगाव, चारकोप आणि चेंबूर विभागातील १५० कुटुंबांना १ महिन्याच्या रेशनचे किट देण्यात आले. यूट्यूवर राहुल काकडे आणि त्यांच्या टीमने ही चारकोप येथे यासाठी सहकार्य केले.

युवा फाउंडेशन या धर्मदाय संस्थेचे संस्थापक सोहम सावळकर व त्यांच्या युवा सहकाऱ्यांच्या प्रयत्नांनी उभी राहिलेली ही संस्था आहे.

या आठवड्यात युवा फाउंडेशनने आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस कोविड योद्धयांची मनशांती आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे विनामूल्य शिबिर ही आयोजित केले आहे. तीन सत्रात सलग तीन दिवस हे शिबिर १० मे पासून सुरू हाेईल, अशी माहिती सोहम सावळकर यांनी दिली.

‘एक हात आधाराचा आणि पोटभर भाकरीचा’ या उद्देशाने युवा फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत ही मदत केली. त्यांनी विद्यार्थी, शेतकरी, दुष्काळग्रस्त ते पूरग्रस्त विभागातील गरजूंना वेळोवेळी मदत केली, असे सावळकर यांनी सांगितले.

------------------------------------

Web Title: Youth Foundation helps 150 needy families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.