नोकरीच्या बहाण्याने तरुणांची फसवणूक

By admin | Published: November 18, 2014 01:49 AM2014-11-18T01:49:20+5:302014-11-18T01:49:20+5:30

नोकरीच्या बहाण्याने अनेक तरुणांची फसवणूक केल्याचा. गुन्हा पनवेल पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. लुफ्थान्सा एअरलाईन्समध्ये नोकरी देण्याचे अमिष दाखवून तरुणांची फसवणूक केली.

Youth fraud by booing jobs | नोकरीच्या बहाण्याने तरुणांची फसवणूक

नोकरीच्या बहाण्याने तरुणांची फसवणूक

Next

नवी मुंबई : नोकरीच्या बहाण्याने अनेक तरुणांची फसवणूक केल्याचा. गुन्हा पनवेल पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे.
लुफ्थान्सा एअरलाईन्समध्ये नोकरी देण्याचे अमिष दाखवून तरुणांची फसवणूक केली. याप्रकरणी करंजाडे येथील व्हिक्टर कार (३२) याच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहे. लुफ्थान्सा एअरलाईन्समध्ये नोकरीसाठी व्हिक्टरने तरुण - तरुणींकडून प्रत्येकी २० हजार रुपये घेतले होते. त्याकरिता पनवेल येथे कार्यालय थाटण्यात आले होते. मात्र तरुणांनी रक्कम भरुनही त्यांना नोकरीला लावण्यात आले नव्हते. त्यामुळे व्हिक्टर याने फसवणूक केल्याचे तरुणांच्या लक्षात आले. त्यानुसार पनवेल पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप १० तरुणांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Youth fraud by booing jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.