Join us

कुर्ला स्टेशनवरील लिंबू सरबतवाल्याचा 'तो' व्हिडिओ या तरुणाने काढला...

By पूनम अपराज | Published: March 26, 2019 6:13 PM

ज्या व्हिडीओमुळे प्रवाशांच्या आरोग्यास हानिकारक अशा अस्वच्छ स्टॉलचे बिंग सिद्धेश पावले या तरुणांमुळे सर्वांसमोर उघड झाले. 

ठळक मुद्देनोकरीनिमित्त सिद्धेश हा भायखळा ते कुर्ला असा नेहमी प्रवास करतो. दोन दिवसांपासून उन्हाचा पारा वाढल्याने आणि प्लॅटफॉर्म क्रमांक ७ आणि ८ च्या छप्पर बसविण्याचे काम सुरु असल्याने लोकलची वाट पाहत सिद्धेश पुलावर उभा होता.सिद्धेशने फेसबुकच्या माध्यमातून आपल्याप्रमाणे सतर्क राहून आजूबाजूला ज्या काही अवैध घटना घडत आहेत त्या सर्व नागरिकांनी सतर्क राहून शूट करून शेअर करा असे आवाहन केले आहे. 

मुंबई - कालपासून चर्चेत असलेल्या कुर्लारेल्वे स्थानकावरील लिंबू सरबतवाल्याचा व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणावर फेसबुक, व्हॉट्स अॅप आणि अन्य सोशल मीडियावर वायरल झाला. त्यानंतर अस्वच्छ लिंबू पाणी बनविणाऱ्या कुर्ल्यातील त्या स्टॉलवर कारवाई करत तो बंद करण्यात आला. मात्र, ज्या व्हिडीओमुळे प्रवाशांच्या आरोग्यास हानिकारक अशा अस्वच्छ स्टॉलचे बिंग सिद्धेश पावले या तरुणांमुळे सर्वांसमोर उघड झाले. 

नोकरीनिमित्त सिद्धेश हा भायखळा ते कुर्ला असा नेहमी प्रवास करतो. दोन दिवसांपासून उन्हाचा पारा वाढल्याने आणि प्लॅटफॉर्म क्रमांक ७ आणि ८ च्या छप्पर बसविण्याचे काम सुरु असल्याने लोकलची वाट पाहत सिद्धेश पुलावर उभा होता. लोकल आल्यावर मी प्लॅटफॉर्मवर जाणार होतो. त्यादरम्यान छप्पर नसल्याने मला अस्वच्छ पद्धतीने लिंबू सरबत बनविले जात असल्याचे दिसून आले आणि ते मी मोबाईलने शूट केले अशी माहिती सिद्धेशने लोकमतशी बोलताना दिली. तसेच मला त्याचा इतका परिणाम होईल आणि तो इतक्या मोठ्या प्रमाणावर वायरल होईल याची कल्पना नव्हती. मी कोणालाही वैयक्तिक पाठविलेला नाही. मात्र, माझ्या फेसबुकला मी तो व्हिडीओ पोस्ट केला होता अशी माहिती त्याने पुढे दिली. आतापर्यंत सिद्धेशच्या फेसबुक अकाउंटवरून २ हजार दोनशे लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. नंतर तो खूपच लोकांपर्यंत वायरल झाला आणि लिंबू सरबत वाल्यांचा व्हिडीओमुले रेल्वेप्रशासनाला जाग आली. नंतर त्या स्टॉलवर कारवाई करत स्टॉल सील करण्यात आला.  

वायरल व्हिडिओत लिंबू पाणी बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यानेच लिंबू सरबत बनविणारा हात धुवत आहे. एका अस्वच्छ पाण्याच्या टाकीतून पाणी घेऊन लिंबू सरबत बनविण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर नागरिकांनी प्रचंड संताप देखील व्यक्त केला आहे. मात्र, वायरल व्हिडिओची सत्यता नागरिकांसमोर आणणाऱ्या नागपाड्याच्या सिद्धेश पावले अस्वच्छ लिंबू सरबतवाल्याचे बिंग उघड केले. त्यामुळेच रेल्वे प्रशासनाला कारवाई करणं भाग पडलं आहे. सिद्धेशचे वडील हे नुकतेच मुंबई पोलीस खात्यातून निवृत्त झाले आहेत. सिद्धेशने फेसबुकच्या माध्यमातून आपल्याप्रमाणे सतर्क राहून आजूबाजूला ज्या काही अवैध घटना घडत आहेत त्या सर्व नागरिकांनी सतर्क राहून शूट करून शेअर करा असे आवाहन केले आहे. 

धक्कादायक...कुर्ला रेल्वे स्थानकावरील छप्पर काढल्याने लिंबू सरबतवाल्यांचे फुटले बिंग

टॅग्स :कुर्लारेल्वे