Join us

दादरमध्ये तरुणाची हत्या, ‘मन्या’ला बेड्या; किरकोळ वादातून हत्या केल्याची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 15:01 IST

शिवाजी पार्क परिसरात २६ डिसेंबरच्या रात्री एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. डोक्यावर वार करत त्याची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवत पोलिसांनी तपास सुरू केला.

मुंबई : दादरमध्ये मृतावस्थेत आढळून आलेल्या तरुणाच्या हत्येचे गूढ उकलण्यास यश आले आहे. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत मनोज अमित सहारे (३०) याला शनिवारी अटक केली. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

शिवाजी पार्क परिसरात २६ डिसेंबरच्या रात्री एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. डोक्यावर वार करत त्याची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवत पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात मृत व्यक्तीचे नाव चंदन असल्याचे समोर आले. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले. त्यात, रात्री १०. ५६ वा. एक जण संशयास्पद फिरताना दिसून आला. चौकशीत त्याचे नाव मन्या सहारे असून तो भंगार वेचण्याचे काम करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांच्या खबऱ्याच्या मदतीने तपास सुरू केला. 

घटनेच्या दिवशी तो चंदन सोबत जाताना पाहिल्याचे सांगताच त्यांच्यावरील संशय आणखीन बळावला. अखेर, त्याला माहीम परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्याच्या अंगावर रक्ताचे डाग असलेले टी शर्ट होता. त्याच्याकडे चौकशी करताच त्याने हत्येची कबुली दिली. किरकोळ वादातून हत्या करण्यात आली आहे.

टॅग्स :गुन्हेगारीपोलिसमृत्यू