लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पश्चिम रेल्वे नेटवर्कवर धावणाऱ्या चार वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांना प्रवाशांचा दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः ३१ ते ४५ वयोगटातील प्रवाशांनी ३३ टक्के पसंती दिली आहे. पश्चिम रेल्वेचे मुंबई जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले की, वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई-गांधीनगर, अहमदाबाद (साबरमती)-जामनगर, अहमदाबाद-जोधपूर आणि इंदूर-भोपाळ-नागपूर सेक्टरवर धावतात आणि प्रवाशांना ‘हिट’ ठरल्या आहेत.
पर्यटनवाढीस मोलाचे योगदान
वंदे भारत ट्रेनचा प्रवास हा किफायतशीर किमतीसह विमानाने प्रवास केल्यासारखा आहे, आरामदायी आसनव्यवस्था, आलिशान इंटिरिअर्स, स्वादिष्ट खाद्यपदार्थ आणि इतर गाड्यांच्या तुलनेत जलद प्रवास अशा शब्दात प्रवाशांनी कौतुक केले आहे. ठाकूर म्हणाले. वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या मुंबई, सुरत आणि अहमदाबादसारख्या प्रमुख व्यावसायिक केंद्रांना, वापी, वलसाड, जामनगर, साणंद, नागपूरची औद्योगिक केंद्रे, जोधपूर, अबू रोडसारखी पर्यटनस्थळे आणि उज्जैन, इंदूर, साबरमती या धार्मिक स्थळांना जोडतात, पालनपूर व्यवसाय व पर्यटनवाढीस मोलाचे योगदान दिले आहे.