युवासैनिकांनी तरुणांना शिवसेनेत आकर्षित करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:06 AM2020-12-22T04:06:45+5:302020-12-22T04:06:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सामान्य शिवसैनिकाला नगरसेवक, आमदार, नेता बनविणारा शिवसेना हा एकच पक्ष आहे. आजचे युवासैनिक हेच ...

Youth soldiers should work hard to attract youth to Shiv Sena | युवासैनिकांनी तरुणांना शिवसेनेत आकर्षित करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी

युवासैनिकांनी तरुणांना शिवसेनेत आकर्षित करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सामान्य शिवसैनिकाला नगरसेवक, आमदार, नेता बनविणारा शिवसेना हा एकच पक्ष आहे. आजचे युवासैनिक हेच भविष्यात शिवसेनेचे पदाधिकारी होऊन नगरसेवक अथवा आमदार होऊ शकतील. परंतु याकरिता त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबरीने पक्ष वाढविण्यासाठी प्रचंड मेहनत करावी, असे मार्गदर्शन शिवसेना विभागप्रमुख, आमदार विलास पोतनीस यांनी शिवसेना विभाग क्र. १मधील शिवसेना, युवासेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात केले.

शिवसेना विभाग क्र. १मधील नवनियुक्त युवासेना पदाधिकाऱ्यांचा सत्कार बोरीवली येथील साईकृपा हॉल येथे आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना युवासेना सचिव वरुण सरदेसाई म्हणाले, शिवसेना नेते व युवासेना प्रमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दल जनतेमध्ये विश्वास आहे. तो विश्वास सार्थ ठरविण्यासाठी युवासेना पदाधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे व येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना पदाधिकाऱ्यांना सहकार्य करावे.

सदर कार्यक्रमात आमदार प्रकाश सुर्वे, युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर, कार्यकारिणी सदस्य सिद्धेश कदम, सिनेट सदस्य शीतल शेठ - देवरुखकर यांनी मार्गदर्शन केले.

व्यासपीठावर विभागसंघटक सुजाता शिंगाडे, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, प्रभाग समिती अध्यक्षा सुजाता पाटेकर, मागाठाणे विधानसभा प्रमुख उदेश पाटेकर, सिनेट सदस्य शशिकांत झोरे, मिलिंद साटम उपस्थित होते. या कार्यक्रमात चारकोप युवा प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी युवासेनेत प्रवेश केला.

---------

Web Title: Youth soldiers should work hard to attract youth to Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.