प्राण्यांवरील अत्याचारांविरोधात तरुणाई एकवटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 12:39 AM2019-11-11T00:39:21+5:302019-11-11T00:39:26+5:30

प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठविण्यासाठी ‘युनायटेड फॉर कॉम्पेशन’ आणि ‘वेगन इंडिया मूव्हमेंट’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अ‍ॅनिमल राइट्स मार्च’चे आयोजन करण्यात आले होते.

The youth united against animal abuse | प्राण्यांवरील अत्याचारांविरोधात तरुणाई एकवटली

प्राण्यांवरील अत्याचारांविरोधात तरुणाई एकवटली

Next

मुंबई : प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठविण्यासाठी ‘युनायटेड फॉर कॉम्पेशन’ आणि ‘वेगन इंडिया मूव्हमेंट’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अ‍ॅनिमल राइट्स मार्च’चे आयोजन करण्यात आले होते. वांद्रे पश्चिमेकडील कार्टर रोड येथे मार्च काढण्यात आला. प्राण्यांपासून मिळणारे अन्न मानवासाठी नाही, तर ते त्यांच्या पिल्लांसाठी आहे, हे सांगण्यासाठी तरुणाई एकवटली होती. तरुणाईने काळ्या रंगाचे कपडे परिधान करून प्राण्यांवरील अत्याचाराविरोधात आवाज उठविला.
प्राण्यांवर प्रेम करा, हिंसा करू नका, असा संदेश यावेळी तरुणाईने दिला. प्राण्यांवर अत्याचार होऊ नयेत, हा या मार्चचे मुख्य उद्देश आहे. रॅलीमध्ये तरुणांनी वाघ, बिबट्या, हरिण आणि गाय इत्यादी प्राण्यांची वेशभूषा करून हातात पोस्टर घेऊन निदर्शने केली. ‘ही पृथ्वी आमची... जशी तुमची...’, ‘आम्हाला वाचवा... नष्ट होण्यापासून...’, ‘आम्ही मित्र... अन्न नाही...’ अशी फलके घेऊन लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंतचे नागरिक मार्चमध्ये सहभागी झाले होते.
मानवाच्या गरजा भागविण्यासाठी शेतामध्ये जनावरांना राबवून त्रास दिला जातो. मानवी करमणुकीसाठी प्राणिसंग्रहालयात वन्यप्राण्यांना डांबून ठेवले जाते, या गंभीर विषयासह आरेत होऊ घातलेल्या प्राणिसंग्रहालयालाही प्राणिमित्रांनी विरोध दर्शविला, तसेच मार्चमध्ये प्राण्यांचे विविध विषय घेऊन त्यावर व्याख्याने दिली गेली. पथनाट्य सादर करण्यात आली, अशी माहिती वेगन इंडिया मूव्हमेंट या ग्रुपने दिली.
>काय आहेत
प्राणिमित्रांच्या मागण्या
घरगुती व वैद्यकीय उत्पादनांच्या चाचणीसाठी प्राण्यांचा वापर करू नका
प्राण्यांवरील लंैगिक अत्याचाराविरोधात कडक कायदा अंमलात आणा.
प्राणीसंग्रहालयातील बंदीस्त वन्यप्र्राण्यांची सुटका करा आणि परदेशातील वन्यप्राण्यांची आयात बंद करा, इत्यादी मागण्या प्राणीप्रेमींनी शासन दरबारी मांडल्या आहेत.
शालेय अभ्यासक्रमात मानवी शरीरासाठी पोषक आणि आरोग्यासाठी उपयोगी असलेला वनस्पती आहार किती फायदेशीर आहे, हे लहान मुलांना समजावून सांगा.

Web Title: The youth united against animal abuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.