तरुणाची विकृत पोस्टरबाजी

By admin | Published: December 8, 2015 01:22 AM2015-12-08T01:22:21+5:302015-12-08T01:22:21+5:30

विवाहितेने शारीरिक संबंधास नकार दिल्याने तिला धडा शिकवण्यासाठी एका विकृत तरुणाने तिचे फोटो पोस्टरवर चिटकवले. एवढ्यावरच हा विकृत तरुण थांबला नाही,

Youth's perverted post-job | तरुणाची विकृत पोस्टरबाजी

तरुणाची विकृत पोस्टरबाजी

Next

मनीषा म्हात्रे ,  मुंबई
विवाहितेने शारीरिक संबंधास नकार दिल्याने तिला धडा शिकवण्यासाठी एका विकृत तरुणाने तिचे फोटो पोस्टरवर चिटकवले. एवढ्यावरच हा विकृत तरुण थांबला नाही, तर ही तरुणी कॉल गर्ल असल्याचे त्याने थेट पोस्टरवर लिहिले. या प्रकरणी पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मस्जिद बंदर येथील परिसरात २५वर्षीय लक्ष्मी (नाव बदललेले आहे) कुटुंबीयांसमवेत राहण्यास आहे. त्याच परिसरात गोविंद मट्टू (२८) राहण्यास आहे. बालपणी दोघांमध्ये घनिष्ठ मैत्री होती. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. व्यवसायाने चालक असलेल्या गोविंदला दारूचे व्यसन जडले. त्यामुळे कुटुंबीयानी दोघांच्या लग्नाला विरोध करत तरुणीचे नाते अन्य कुटुंबाशी जोडले. विवाहानंतरही ही तरुणी याच परिसरात वास्तव्यास होती. लग्नाच्या काही वर्षांनंतर गोविंदने तिच्याकडे शारीरिक संबंधांसाठी तगादा लावला. तिच्याशी जवळीकीचा प्रयत्न करणे, नकार देताच तिला मारहाण करून व्हिडीओ आणि फोटो पतीला दाखविण्याची धमकी देणे, असले प्रकार त्याने सुरू केले. ही तरुणी पतीला ही माहिती मिळण्याच्या भीतीने अत्याचार निमूटपणे सहन करत होती. तिच्याकडून त्याने तब्बल १० हजार रुपयेही उकळले.
गोविंदच्या वाढत्या मागण्या आणि विकृत वृत्तीला कंटाळून या तरुणीने प्रेमसंबंधास नकार देत पैसे देणेही बंद केले. तिने त्याचे फोन घेणेही बंद केले. अखेर तिला धडा शिकवण्यासाठी शनिवारी तिचे फोटो पोस्टरवर चिकटवून तिला कॉल गर्ल भासविण्याचा प्रताप या विकृताने केला. पोस्टरवर तिचा मोबाइल क्रमांक दिल्याने लक्ष्मीला अश्लील कॉल येणे सुरू झाले. सुरुवातीला या प्रकारामुळे ती गोंधळून गेली. या बॅनरवर तिच्या कुटुंबीयांची, पतीची नजर पडली. ही बाब लक्ष्मीला समजताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. ठिकठिकाणी हे पोस्टर लागल्यामुळे तिला घराबाहेर पडणे कठीण बनले. अखेर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास गोविंदच्या जाचाला कंटाळून लक्ष्मीने पतीच्या मदतीने पायधुनी पोलीस ठाणे गाठून अत्याचाराला वाचा फोडली. लक्ष्मीच्या तक्रारीवरून गोविंदविरुद्ध विनयभंग, धमकावणे, बदनामी, मारहाणीसह जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले.
व्हिडीओही
केले व्हायरल...
लक्ष्मीसोबतचे व्हिडीओही गोविंदने अनेकांना व्हॉट्स-अ‍ॅप केल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पायधुनी पोलिसांनी दिली.

Web Title: Youth's perverted post-job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.