दिवाळीची कलाकुसर शिकवतेय ‘युट्यूब गुरू’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 11:16 PM2018-10-30T23:16:33+5:302018-10-30T23:16:57+5:30
दिवाळीच्या कंदील, दिवे, रांगोळ्या ते थेट शॉपिंगपर्यंत सगळेच धडे सध्या नेटीझन्स युट्यूबवरून शिकत आहेत.
मुंबई : गेल्या काही वर्षांत दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये छंद कार्यशाळा, शिबिरे असे अनेक उपक्रम पार पडायचे. या उपक्रमांना घराघरांतून प्रतिसाद मिळत असे, मात्र आता हे रूपडे पालटून थेट अवघ्या एका क्लिकवर साऱ्या शिकवण्या आल्या आहेत. दिवाळीच्या कंदील, दिवे, रांगोळ्या ते थेट शॉपिंगपर्यंत सगळेच धडे सध्या नेटीझन्स युट्यूबवरून शिकत आहेत.
लहानग्यांपासून अगदी साठीच्या आजी-आजोबांपर्यंत सगळेच या स्मार्टफोन्सवरून धडे घेत शिकत आहेत. बºयाच युट्यूब चॅनेल्सवर सण-उत्सवांदरम्यानच्या शॉपिंगविषयीचे सल्ले दिले जातात. हे व्हिडीओ बघणाºयांची संख्याही अधिक आहे. याशिवाय, साधी रांगोळी काढण्यापासून ते थेट संस्कार भारतीचे रांगोळी काढण्याचे धडे अगदी ‘लाइव्ह’ पद्धतीने शिकण्यासाठी तरुणाईची धडपड सुरू आहे. बºयाचदा क्लासेसमध्ये पैसे न देता तरुण-तरुणींचे गु्रप एकत्र येऊन व्हिडीओ सुरू करून त्याच वेळीस रांगोळी काढतात. जेणेकरून या शिकवणीचा निकालही तिथल्या तिथे मिळतो.
कंदिलांच्या बाबतीत हाच प्रकार सुरू आहे. गेल्या काही वर्षांत पर्यावरणपूरक कंदिलांकडे ग्राहकांचा ओढा आहे. त्यामुळे युट्युबवर कपडे, कागद, बांबू, पुठ्ठा अशा विविध साहित्यांद्वारे कंदील बनविण्याचे अवघ्या काही मिनिटांच्या व्हिडीओंना पसंती मिळत आहे. याशिवाय, पणत्यांची आरास, वेगवेगळ्या पद्धतीचे दिवे, टाकाऊपासून टिकाऊ दिवे बनविण्याचे प्रशिक्षण देणारे व्हिडीओ नेटीझन्सला आवडतात.
युट्यूबद्वारे फराळ बनवण्याकडे कल
दिवाळीच्या अन्य तयारीप्रमाणेच फराळ बनविण्याचे प्रशिक्षण युट्यूब चॅनेल्सवरून मिळत आहे. या व्हिडीओला गृहिणी वर्गाकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. बºयाच गृहिणींचे पाककला शिकविणारे अनेक चॅनेल्स युट्यूबवर आहेत. यात सध्या दिवाळीचा फिव्हर दिसून येत असून पारंपरिक फराळाच्या पाककृतींपासून ते थेट नव्या चवीच्या फराळाच्या कृतींना पसंती मिळत आहे.