यूट्युब स्टार ठरला भरधाव वेगाचा बळी; मानखुर्दमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 06:26 AM2018-12-21T06:26:35+5:302018-12-21T06:27:11+5:30

कुर्ला येथील रहिवासी असलेला दानीश हा यूट्युबवर त्याच्या व्हिडीओंसाठी प्रसिद्ध आहे.

Youtube star rises fast; Events in Mankhurd | यूट्युब स्टार ठरला भरधाव वेगाचा बळी; मानखुर्दमधील घटना

यूट्युब स्टार ठरला भरधाव वेगाचा बळी; मानखुर्दमधील घटना

Next

मुंबई : लग्नसमारंभ उरकून भरधाव कारमधून भावासोबत निघालेला यूट्युब स्टार दानीश गफ्फर मुल्ला उर्फ दानीश झेआन (२३) याचा सायन-पनवेल महामार्गावर लोखंडी खांबाला धडकून अपघात झाला. या अपघाताच त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या भावावर उपचार सुरू आहेत. मानखुर्द पोलिसांनी दानीशविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कुर्ला येथील रहिवासी असलेला दानीश हा यूट्युबवर त्याच्या व्हिडीओंसाठी प्रसिद्ध आहे. यूट्युबवर त्याचे हजारो फॉलोअर्स होते. बुधवारी मुंबईत लग्नसोहळा उरकून दानीश हा भाऊ शेझाद शरीफ सय्यद (२३) याला सीवूडला सोडण्यासाठी निघाला. बुधवारी रात्री १ च्या सुमारास सायन - पनवेल महामार्गावरून जात असताना, दानीशचे कारवरचे नियंत्रण सुटले. कार लोखंडी खांबाला धडकली. या भीषण अपघातात दानीशचा जागीच मृत्यू झाला. तर, भाऊ सय्यद गंभीर जखमी आहे. मानखुर्द पोलिसांनी दानीशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. तर सय्यदवर उपचार सुरू आहेत. सय्यद याला पुढील उपचारांसाठी वाशीमधील पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सय्यदने पोलिसांना दिलेल्या माहितीत, मानखुर्द उड्डाणपूल क्रॉस केल्यानंतर जकात नाक्याच्या आधी रस्त्याच्या मधोमध एक दगड दिसला. हा दगड चुकविताना कार दगडावर चढली. दरम्यान, दानिशचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारची लोखंडी खांबाला धडक बसून अपघात झाल्याचे त्याने सांगितले. त्याच्या या जबाबावरून मृत कार चालक दानीशविरोधात निष्काळजीपणे भरधाव वेगाने वाहन चालवून स्वत:च्या मृत्यूस आणि भावाला गंभीर दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी भादंवि आणि मोटारवाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानुसार, पोलीस अधिक तपास करीत आहेत.
 

Web Title: Youtube star rises fast; Events in Mankhurd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.