लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ‘इंडियाज गॉट लेटेंट’मध्ये यूट्युबर रणवीर अलाहबादियाने केलेल्या वादग्रस्त विधानाप्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागाने सोमवारी यूट्युबर समय रैनाची साडे पाच तास चौकशी करीत त्याचा जबाब नोंदविला आहे. त्यानुसार पुढील तपास सुरू आहे.रैनाने परदेशात असल्यामुळे आपली चौकशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्याची विनंती केली होती. मात्र, ती मागणी महाराष्ट्र सायबर विभागाने फेटाळली आहे. त्याला पुन्हा समन्स पाठवून चौकशीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते.
... तर पुन्हा बोलावणार
सोमवारी दुपारी एकच्या सुमारास तो महाराष्ट्र सायबर विभागाच्या कार्यालयात आला होता. सायंकाळी पावणे सातच्या सुमारास तो तेथून बाहेर पडला. महाराष्ट्र सायबर विभागाने सुमारे साडे पाच तास त्याची चौकशी करीत त्याचा जबाब नोंदविला आहे. गरज पडल्यास त्याला पुन्हा बोलावण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र सायबर विभागानेही या प्रकरणी सुमारे ५० जणांना समन्स बजावले आहेत. त्यात कार्यक्रमांच्या १ ते ६ भागांमध्ये सहभागी परीक्षक, स्पर्धकांचा समावेश आहे.