चिमुकल्यांच्या लढ्याला यश

By admin | Published: August 14, 2015 02:05 AM2015-08-14T02:05:05+5:302015-08-14T02:05:05+5:30

विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गदा आणून होणाऱ्या कारवाईविरोधात बांगर विद्यालय प्रशासनाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर उच्च न्यायालयाने

Yudh | चिमुकल्यांच्या लढ्याला यश

चिमुकल्यांच्या लढ्याला यश

Next

मुंबई : विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गदा आणून होणाऱ्या कारवाईविरोधात बांगर विद्यालय प्रशासनाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर उच्च न्यायालयाने या प्रशासनाच्या बाजूने हिरवा झेंडा दाखवत विकासकाला विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष पूर्ण होईपर्यंत शिक्षणासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश मिळाल्याने विद्यार्थ्यांनी जल्लोष केला आहे.
चांदिवली येथील संघर्षनगर परिसरातील कुशाभाऊ बांगर या अनुदानित शाळेवर विकासकाच्या संगनमतामुळे कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. शिक्षणाचा हक्क हिरावू नये, म्हणून चिमुकल्यांची धडपड सुरू होती. शाळेत शिक्षण घेणाऱ्या सुमारे ३५० विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधातच आवाज बुुलंद करत शिक्षणाचा हक्क राखण्यासाठी लढा सुरू केला. दोन वेळा शाळेवर बुलडोझर आणि हातोडा घेऊन कारवाईसाठी आलेल्या पालिका प्रशासन आणि पोलिसांना चिमुकल्यांपुढे माघार घ्यावी लागली.

Web Title: Yudh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.