Aaditya Thackeray Vs Devendra Fadnavis: “इंग्रजांवर केंद्रीय यंत्रणांच्या धाडी पडत नव्हत्या”; आदित्य ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 02:12 PM2022-05-05T14:12:49+5:302022-05-05T14:13:31+5:30

Aaditya Thackeray Vs Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस मागच्या जन्मात कोणत्या बाजूने होते, हे शोधावे लागेल, असा पलटवार आदित्य ठाकरे यांनी केला.

yuva sena leader and minister aaditya thackeray replied bjp devendra fadnavis over criticism | Aaditya Thackeray Vs Devendra Fadnavis: “इंग्रजांवर केंद्रीय यंत्रणांच्या धाडी पडत नव्हत्या”; आदित्य ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर

Aaditya Thackeray Vs Devendra Fadnavis: “इंग्रजांवर केंद्रीय यंत्रणांच्या धाडी पडत नव्हत्या”; आदित्य ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर

Next

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि युवासेना नेते तसेच राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यात आरोप-प्रत्यारोप रंगताना पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी मशिद पतनावेळी शिवसैनिक नव्हता, असा दावा केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून देवेंद्र फडणवीस १८५७ च्या लढ्यातही सहभागी असतील, असा प्रतिटोला आदित्य ठाकरे यांनी लगावला होता. यानंतर पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंचा मर्सिडीज बेबी असा उल्लेख करून निशाणा साधला. आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या टीकेवर पलटवार केला आहे. 

बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली. देशात अनेक प्रश्न असताना त्यावर कोणी बोलत नाही. केंद्र सरकारकडून विरोधी पक्षांचा आवाज दाबला जात आहे. इतिहासावर भांडून आपल्या काय मिळणार आहे. एक देश म्हणून आपल्याला पुढे जायचे असेल तर सध्याच्या प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे. स्वत:चे राजकीय पुनरुज्जीवन करण्याची किंवा सरकारवर टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण त्यासाठी दंगली घडवण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही. त्यामुळे देशाची प्रतिमा मलीन होत आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. 

इंग्रजांवर केंद्रीय यंत्रणांच्या धाडी पडत नव्हत्या

थोडा इतिहासाचा अभ्यास केला, तर कुठेही इंग्रजांवर केंद्रीय यंत्रणाच्या धाडी पडल्यात किंवा तेथे सरकार पडलेय, असे कधी जाणवले नाही. उलट इथे डिव्हाइड अँड रुल व्हायचे. देवेंद्र फडणवीस मागच्या जन्मात कोणत्या बाजूने होते, हे शोधावे लागेल, असा पलटवार आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.

दरम्यान, तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या मर्सिडीज बेबींनी ना संघर्ष केला आहे, ना संघर्ष पाहिला आहे. त्यामुळे कारसेवकांच्या संघर्षाची थट्टा ते उडवू शकतात. आमच्यासारखे लाखो कारसेवक जे बाबरी पाडली गेली तेव्हा तिथे उपस्थित होते त्यांना आजही गर्व आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. तसेच मी हिंदू आहे आणि त्यामुळे माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे. त्यामुळे मागील जन्मामध्ये मी असेल तर १८५७ च्या युद्धामध्ये तात्या टोपे आणि झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या बाजूने लढत असेल आणि तुम्ही असाल तर त्याही वेळी तुम्ही इंग्रजांसोबत युती केली असेल. कारण आता तुम्ही अशा लोकांसोबत युती केली आहे जे १८५७ च्या युद्धावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते तर शिपायांचं बंड होते, अशा मताचे आहेत, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. 
 

Web Title: yuva sena leader and minister aaditya thackeray replied bjp devendra fadnavis over criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.