Join us

अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत युवा सेना सर्वोच्च न्यायालयात; परीक्षा न घेण्याबाबत याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 1:16 AM

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी परीक्षा न घेण्याच्या निर्णयाचा पुनरुच्चारही केला.

मुंबई : अंतिम वर्षाच्या परीक्षांवर यूजीसी आणि राज्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभागात वाद आहे. या दरम्यान आता युवासेनेने यूजीसीच्या विरोधात युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार थेट सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. युवासेना सरचिटणीस वरुण देसाई यांनी ही माहिती दिली.

यूजीसीच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार देशातील विद्यापीठ आणि उच्चशिक्षण संस्थांना सप्टेंबरच्या अखेरीस अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षान घेण्याचा निर्णय घेतला आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी परीक्षा न घेण्याच्या निर्णयाचा पुनरुच्चारही केला. त्यामुळे कोविडच्या पार्श्वभूमी त्या त्या राज्याच्या परिस्थितीनुसार प्रत्येक राज्यातील विद्यापीठांना संबंधित अंतिम वर्षांच्या परीक्षांचा निर्णय घेण्याचा अधिकार द्यावा, जेणेकरून विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल, अशी विनंती या याचिकेत केल्याचे सरदेसाई म्हणाले.

आदित्य ठाकरे यांची टिष्ट्वटवरून माहिती

शैक्षणिक पात्रात केवळ एका परीक्षेवर अवलंबून असता कामा नये तर ती मागील सेमिस्टरच्या सरासरीवरून ठरवली जावी. त्यानंतरही विद्यार्थ्याला श्रेणी सुधार हवा असल्यास त्याला ती संधी द्यावी, असे आमचे ठाम मत आहे.कोणत्याही सुरक्षेचा विचार न करता यूजीसीने लादलेल्या निर्णयाविरोधात युवासेनने याचिका दाखल केल्याचे टिष्ट्वट आदित्य ठाकरे यांनी केले. तर याचिकेला युवक काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे टिष्ट्वट युवक काँग्रेसचे सत्यजीत तांबे यांनी केले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसआदित्य ठाकरेशिवसेना