विद्यापीठाच्या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये जाकीर, वेबसाईटवरचे नाव हटवण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 02:14 AM2020-10-30T02:14:48+5:302020-10-30T06:59:37+5:30

Zakir Naik News : विद्यापीठाच्या,  वेबसाईटवर यशस्वी माजी विद्यार्थ्यांच्या यादीत देशद्रोही  जाकीर  नाईक याचे नाव  झळकत असून  ते  राज्य सरकारने तात्काळ हटवावे अशी मागणी आमदार अतुल  भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे  केली.

Zakir Naik in university's successful students list, demanded the deletion of the name on the website | विद्यापीठाच्या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये जाकीर, वेबसाईटवरचे नाव हटवण्याची मागणी

विद्यापीठाच्या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये जाकीर, वेबसाईटवरचे नाव हटवण्याची मागणी

Next

मुंबई  - नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य  विज्ञान विद्यापीठाने जिहादी  जाकीर नाईकची आठवण वेगळ्या अर्थाने जपली आहे.  विद्यापीठाच्या,  वेबसाईटवर यशस्वी माजी विद्यार्थ्यांच्या यादीत देशद्रोही  जाकीर  नाईक याचे नाव  झळकत असून  ते  राज्य सरकारने तात्काळ हटवावे अशी मागणी आमदार अतुल  भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे  केली.
दहशतवादी कारवायांत प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष  सहभागाप्रकरणी  झाकीर नाईक आरोपी असून चौकशी टाळण्यासाठी तो  फरार झाला आहे.  करोडो रुपयांची अफरातफर व  हवाला रॅकेट प्रकरणी अंमलबजावणी  संचालनालयाकडून त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. 

बांगलादेश, इंग्लंड यांसह अनेक देशांमध्ये  जाकीर नाईकला प्रवेशास व ऑनलाइन भाषण देण्यास  सुद्धा  बंदी घालण्यात आलेली आहे. अशा त्याने केलेल्या  देशद्रोह्याचे नाव एखाद्या विद्यापीठाच्या  वेबसाईटवर  यशस्वी विद्यार्थ्यांच्या यादीत नोंदवणे हि  अत्यंत आक्षेपार्ह व लाजिरवाणी  बाब असून राज्य सरकारने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,  वेबसाईटवरून जाकी नाईक याचे नाव हटविण्यासाठी आदेश द्यावेत अशी आग्रही मागणी आमदार अतुल  भातखळकर यांनी केली  आहे. 下आगामी अधिवेशनात  या विरोधात आवाज उठविणार असल्याचेसुद्धा ते म्हणाले. 
 

Web Title: Zakir Naik in university's successful students list, demanded the deletion of the name on the website

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.