Join us  

६८ लाख रुपये घेऊन कामगार नॉट रिचेबल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 5:48 AM

याप्रकरणी गुजरातच्या सोने व्यापाऱ्याने मुंबईत धाव घेत पोलिसात तक्रार दिली.

मुंबई : झवेरी बाजारातील व्यापाऱ्याकडून मालकाचे ६८ लाख रुपये घेऊन निघालेला कामगार नॉट रिचेबल झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुजरातच्या सोने व्यापाऱ्याने मुंबईत धाव घेत पोलिसात तक्रार दिली. याप्रकरणी एलटी मार्ग पोलिसांनी कामगार रमेश गंगाराम वेद याच्याविरुद्ध गुरुवारी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.

गुजरातचे रहिवासी असलेले राजेश चंद्रकांत चोकसी (४९) यांच्या तक्रारीनुसार, १२ ऑगस्टला त्यांनी विश्वासू कामगार वेद याला झवेरी बाजारातील व्यापाऱ्याकडे व्यवहाराचे पैसे घेण्यासाठी पाठवले. झवेरी बाजारातील व्यापाऱ्याने राजेश यांच्याशी बोलणे झाल्यानंतर वेद याला ६८ लाख रुपये दिले. मात्र, त्यानंतर काही वेळाने वेद हा नॉट रिचेबल झाल्याने त्यांना धक्का बसला. बराच वेळ वाट बघूनही हाती काहीच न लागल्याने त्यांना संशय आला. अखेर, फसवणूक झाल्याची खात्री पटताच त्यांनी गुरुवारी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. परिसरातील सीसीटीव्ही तसेच अन्य तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. वेद हा मूळचा राजस्थानचा रहिवासी आहे.  

टॅग्स :मुंबईमुंबई पोलीसगुन्हेगारी