Join us

वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 7:30 PM

माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची मुंबईत हत्या झाली. या हत्येनंतर एकच खळबळ उडाली.

माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी पथक करत बाहेरच्या राज्यातही धाडी टाकल्या आहेत. काल आमदार झिशान सिद्दिकी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दरम्यान, आता झिशान सिद्दिकी यांनी सोशल मीडियावर एक्स वर एक पोस्ट केली आहे.या पोस्टवरुन आता उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!

झिशान सिद्दिकी यांनी कालही एक पोस्ट केली होती, या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "जो लपलेला असतो तो झोपलेला असतोच असे नाही. जो दिसतो तोच बोलतो असे नाही."अशी पोस्ट केली होती. आता आजही सिद्दिकी यांनी पोस्ट केली आहे. 

आज केलेल्या पोस्टमध्ये, "भ्याड बहुधा शूरांना घाबरवतात, कोल्हाही कपटाने सिंहांना मारतो, अशी पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे आमदार झिशान सिद्दिकी यांचा रोख कुणाकडे आहे, या चर्चा सुरू आहेत. 

१२ ऑक्टोबर रोजी मुंबईतील वांद्रे भागात आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाजवळ बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली असून यातील पाच जणांना शुक्रवारी पनवेल आणि कर्जत येथे छापे टाकून अटक करण्यात आली. लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या शूटरने या घटनेची जबाबदारी घेतली आहे. फेसबुक पोस्ट करुन जबाबदारी स्विकारली होती. यात बाबा सिद्दिकी यांचा दाऊद इब्राहिमशी संबंध जोडले होते.

गुरुवारी मुंबई पोलिसांनी मुख्य शूटर शिवकुमार गौतमसह तीन आरोपींना देशातून पळून जाण्यापासून रोखण्यासाठी लुकआउट सर्कुलर जारी केले. एलओसीमध्ये नाव असलेल्या इतर दोन आरोपींमध्ये सह-कारस्थान शुभम लोणकर आणि संशयित हँडलर मोहम्मद जीशान अख्तर आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपींना पकडण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथके देशाच्या विविध भागात पाठवण्यात आली आहेत. आरोपी देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करू शकतात म्हणून एलओसी जारी करण्यात आली आहे. 

टॅग्स :बाबा सिद्दिकीपोलिसट्विटर