धारावीत पाचव्यांदा शून्य कोरोनाबाधित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:06 AM2021-07-08T04:06:33+5:302021-07-08T04:06:33+5:30

मुंबई - धारावी पॅटर्नमुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार आता पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये पाचवेळा धारावी भागात ...

Zero coronary artery disease for the fifth time in Dharavi | धारावीत पाचव्यांदा शून्य कोरोनाबाधित रुग्ण

धारावीत पाचव्यांदा शून्य कोरोनाबाधित रुग्ण

Next

मुंबई - धारावी पॅटर्नमुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार आता पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये पाचवेळा धारावी भागात शून्य बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. बुधवारी पुन्हा येथील स्कोअर शून्य असल्याने २१ सक्रिय रुग्ण आहेत.

आशिया खंडातील मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक असलेल्या धारावीमध्ये एप्रिल २०२० मध्ये कोरोनाचा संसर्ग झाला. मात्र, यातूनच आकार घेणाऱ्या धारावी पॅटर्नने कोरोनाचा प्रसार रोखला. तर, दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यातही धारावी पॅटर्न प्रभावी ठरला. जास्तीतजास्त लोकांची चाचणी, बाधितांच्या संपर्कातील लोकांना शोधणे, तत्काळ विलगीकरण आणि त्वरित उपचार ही चार सूत्रे पालिकेने कायम ठेवली आहेत.

* यापूर्वी जानेवारी महिन्यात २२, २६, २७, ३१ जानेवारी आणि २ फेब्रुवारीस धारावीमध्ये शून्य रुग्णांची नोंद झाली होती.

* दुसऱ्या लाटेत धारावीत झोपडपट्ट्यांमध्ये नव्हे तर इमारतींमध्ये रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून आले. मात्र, पुन्हा उपाययोजनांनंतर कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आला आहे. यापूर्वी १४, १५, २३ जून आणि ४ जुलै रोजी शून्य रुग्णांची नोंद झाली आहे.

आतापर्यंत रुग्णसंख्या

परिसर....एकूण....सक्रिय....डिस्चार्ज...आजची स्थिती

दादर....९७१६....१२५.....९४०७.... १५

धारावी....६९०५....२१....६५२५... ००

माहीम....१००३९....७२....९७६५.... ०५

Web Title: Zero coronary artery disease for the fifth time in Dharavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.