Join us

गेल्या २४ तासांत शून्य पावसाची नोंद; मुंबईत पाऊस बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 2:13 AM

७ ठिकाणी पडझड, महिला जखमी

मुंबई : पावसाने मुंबईत बऱ्यापैकी विश्रांती घेतली असून, गेल्या २४ तासांत मुंबईत सांताक्रुझ आणि कुलाबा वेधशाळेत ०.० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाऊस कोसळत नसला तरी ७ ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. त्यानुसार, २ ठिकाणी बांधकामाचा भाग पडला.

परळ येथील पेरू चाळीमध्ये छताचा भाग कोसळून एक महिला किरकोळ जखमी झाली. या महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले. मनस्वी चिल्ले असे या महिलेचे नाव आहे. ४ ठिकाणी झाडे कोसळली. एका ठिकाणी शॉर्ट सर्किटची घटना घडली. सुदैवाने उर्वरित घटनांत कोणीही जखमी झालेले नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून पाऊस बेपत्ता आहे. मुंबईत कित्येक दिवसांनी कडाक्याचे ऊन पडले होते.

हवामान खात्याकडील माहितीनुसार, मान्सूनसाठी सध्या पोषक वातावरण नाही. २६ जुलैच्या आसपास हवामानात मान्सूनसाठी पोषक बदल होतील. नंतर पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :पाऊसमुंबई