Join us

जि.प. शाळांमधून खडू-फळा हद्दपार?

By admin | Published: December 09, 2014 10:59 PM

मुलांना टॅबद्वारे शिक्षण देण्याचा विचार शिक्षकांनी केला आहे. आता शाळामधून खडू आणि फळा हद्दपार होणार असे दिसत़े

बिर्ला गेट : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ठाणो जिल्ह्यातील पहिली डिजिटल शाळा बनण्याचा बहुमान मिळविलेल्या शहापूर तालुक्यातील पष्टेपाडा शाळेच्या धर्तीवर कल्याणमधील शाळांमध्ये असे तंत्रज्ञान वापरून मुलांना टॅबद्वारे शिक्षण देण्याचा विचार शिक्षकांनी केला आहे. आता शाळामधून खडू आणि फळा हद्दपार होणार असे दिसत़े
सध्या सर्वत्र ई-लर्निगचे वारे वाहू लागले आहे. शासनाच्या जिल्हा परिषदेच्या शाळामध्येही या प्रणालीला सुरूवात झाली आहे. शहापूर तालुक्यातील पष्टेपाडा ही राज्यातील पहिली डिजिटल शाळा ठरली या शाळेचे शिक्षक संदीप गुंड यांच्या कल्पनेतून विद्याथ्र्याना टॅबलेट देवून अध्यापन सुरू झाले. मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओङो नाहीसे झाल्याने पालकांनीही या अभिनव उपक्रमाचे स्वागत केल. (वार्ताहर)
 
4जि़प़ शाळांसमोर मोठी समस्या म्हणजे भारनियमन व वीज बिल यावरही गुंड यांनी सोलर सिस्टिमच्या पर्याय शोधल्याने आदिवासी वाडय़ा वसत्यामध्येही डीजीटल शाळा सुरू करण्यात येऊ लागल्या. 
4त्यामुळे याच धर्तीवर कल्याण तालुक्यातही अशा डिजिटल शाळा सुरू कराव्यात म्हणून तालुक्यातील वरप येथे डिजिटल शाळा व गुणवत्ता विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 
 
4या करिता परिसरातून 5क्क् शिक्षक व शिक्षिका, प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांचे शिबिर आयोजिले गेले. त्यास संजय थोरात, आशिष सूर्यराव, महेंद्र धिमने, अलका थोरात उपस्थित होते. उद्घाटन गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे यांनी केले.